पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नेमाने सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे हे आपल्या दैनिक साधनेचे उद्दिष्ट असले पाहिजे. या सततच्या प्रयत्नातून सूर्यनमस्कार साधनेतील श्रद्धा विकसित होते. एखाद्या गोष्टीचे ज्ञान आहे पण त्याची कृती केलेली नाही. त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला नाही तर ते अर्धवट ज्ञान झाले. या अर्धवट ज्ञानाचा टेंभा मिरविला तर ती अंधश्रद्धा होते. त्यातून कोणताच फायदा होत नाही. श्रद्धेने प्रयत्नांना सामर्थ्य मिळते तर अंधश्रद्धेने प्रयत्नांचे पंख कापले जातात. " सराव व सिद्धांत दोन्ही एकत्र आल्यास सूर्यनमस्काराचे सर्व फायदे साधकाला देण्यासाठी दोघांमध्ये अटीतटीची स्पर्धा सुरू होते. या दोघांच्या संयोगाने प्रत्येक साधकाला जग बदलण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. 6 अचुक येत्न करवेना । म्हणौन केले ते साजेना। आपला अवगुण जाणवेना | काही केल्या ।। १२-२-१ यासाठी सूर्यनमस्काराची अधिक माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ही माहिती इतरांना सांगण्यासाठी / शिकविण्यासाठी करून घेतली तर अधिक परिणामकारक पद्धतीने ती आत्मसात करता येते. यासाठी सूर्यनमस्कार घालतांना तुमच्या व्यतिरिक्त किमान एकतरी व्यक्ती बरोबर असावी. ती कुटुंबातील, नात्यातील, मित्रपरिवारातील परिसरातील कोणीही चालेल. उभयता पती-पत्नी फारच उत्तम. कारण ही गाठ आयुष्यभराची असते. आपल्या जोडिदाराची सूर्यनमस्कार साधना अखंडित असावी म्हणून दोघेही प्रयत्नशील असतात. साधनेत सातत्य सहज साधता येते. या सातत्यामुळे कुटुंबाची व्याप्ती आपोआप वाढते. आपल्या कुटुंबामध्ये आपला जोडीदार, मुले, आईवडील, मित्र, नातेवाईक, शेजारी, गांवकरी, देशातील रहिवासी व जगातील नागरिक यांचा समावेश होतो. आपल्या कुटुंबामध्ये या सर्वांचा समावेश झाल्याने त्यांना सूर्यनमस्कार साधनेमध्ये मदत करण्याची जबाबदारी ओघाने आलीच. पुढील श्लोकामध्ये सूर्यनमस्काराची थोडक्यात व्याख्याच केलेली आहे. 6 समर्थ रामदास स्वामी शक्ती आणि भक्तीची बेरीज १ + १ = ११ अशी करतात. मारुतीरायाची शक्ती व त्याची रामभक्ती म्हणजेच हा अकरावा मरुत, भीमरुपी बजरंग होय. शक्ती + भक्ती = संकल्पसिद्धी. सूर्यनमस्कार एक साधना १९