पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

काही महत्वाचे प्रकार आहेत संकल्प श्लोक, सूर्यनारायणाची प्रार्थना, प्रणव उच्चार, सूर्यमंत्र, बीजाक्षर मंत्र, तृचाकल्प सूर्यनमस्कार, हंसकल्प सूर्यनमस्कार, फलश्रुती श्लोक, सूर्यनारायणाला वंदन, समर्पणाचा श्लोक, फलश्रुती श्लोक (दोन), जयजयकार, इत्यादी. पण मंत्र आणि श्लोक सूर्यनमस्काराचे संप्रेरक आहेत. या सर्व मंत्र - श्लोकांचे चिंतन दररोज करा. संप्रेरकांचा अर्थ, अन्वयार्थ, गर्भितार्थ आणि सूर्यनमस्काराचा प्रत्यक्ष सराव करतांना येणारी अनुभूती यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करा. हा प्रयत्न जसजसा यशस्वी होत जाईल तसतशी मंत्र आणि विधी या दोघांच्या युतीची ताकद लक्षात येईल. एका शिवाय दुसरा बलहीन आहे याचा अनुभव सर्वसाधारणपणे हा संप्रेरकाचा किंवा श्लोक-मंत्र पठणाचा भाग आपण झटपट उरकतो. त्यामध्ये उल्लेख केलेले सूर्यनमस्काराचे ध्येय, प्रत्येक आसनातील उद्दिष्ट, ते साध्य करण्याची पद्धती यांचा मेळ दररोजच्या सरावामध्ये घातला जात नाही. सूर्यनमस्काराची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात नाही. काही वेळेला चुकीची पद्धत वापरल्यामुळे नको त्या स्नायूंना अनावश्यक ताण-दाब मिळतो. ही चूक पुढील सूर्यनमस्कारामध्ये सुधारली तर ठीक, नाहीतर ते स्नायू दुखण्यास सुरुवात होते. सूर्यनमस्काराची साधना खंडित होते. हा पठणाचा भाग मला येत नाही. त्याचा अर्थ समजत नाही. तो पाठ होत नाही. तरी सूर्यनमस्काराची महती मला माहीत आहे. सूर्यनमस्काराच्या या गृहित तत्त्वांवर माझा विश्वास आहे. त्यावर माझी श्रद्धा आहे. मी दररोज सूर्यनमस्कार घालतो. सूर्यनमस्कार हा माझ्या स्व चा अविभाज्य भाग आहे. आज नाही उद्या मला या साधनेचे सर्व फायदे मिळणार आहेत. याचीही मला खात्री आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा एक प्रयत्न फसला तरी मी निराश होणार नाही. वारंवार प्रयत्न करणारच. कारण ही साधना अनादिकालापासून सुरू आहे. ही स्वयंसिद्ध साधना आहे. माझे प्रयत्न अपुरे आहेत याची मला जाणीव आहे. हा या मंत्रश्लोकाचा सर्वसाधारण बोध आहे. प्रत्येक सूर्यनमस्कार साधकाने तो लक्षता ठेवायला हवा. प्रत्येकाला ठळकपणे माहिती असलेली सूर्यनमस्काराची काही महत्वाची सूर्यनमस्कार एक साधना १७