पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सरावामुळे आपल्याला शारीरिक व मानसिक आरोग्य मिळते. निरोगी आणि बलवान शरीरामुळे आपण कमी वेळेमध्ये जास्त काम करतो. आपले कामाचे एकूण तासही वाढतात. विकल्परहित मन लवकर एकाग्र होते. त्यामुळे प्रत्येक काम आत्मविश्वासाने आणि उत्तम पद्धतीने केले जाते. साहजिकच संकल्प पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रयत्नांची कक्षा रुंदावते. अधिक प्रयत्न म्हणजे यशाची हमी. यशातून यश वाढते. प्रत्येक यशस्वी प्रयत्न आपल्याला सुख, संपत्ती, किर्ती अपेक्षित असलेले सर्वकाही देतो. हा समर्पणाचा श्लोक सर्वात शेवटी म्हणायचा. संकल्प श्लोकाप्रमाणे याला पर्याय नाहीत. हा श्लोक प्रत्येक धार्मिक विधी नंतर म्हटला जातो. सूर्यनारायणाला वंदन अकालमृत्यु हरणं सर्व व्याधि विनाशनम् सूर्य पादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्।। श्लोकाचा अर्थ हे सूर्यतीर्थ सर्व रोगव्याधी (मानसिक व शारीरिक ) तसेच अकाली मृत्यूपासून संरक्षण करणारे आहे. त्याचे मी प्राशन करतो. अन्वयार्थ - सूर्यनमस्काराच्या अखंड सरावामुळे शरीर आरोग्यसंपन्न, बलवंत होते. त्यामुळे छोटे-मोठी दुखणी-खुपणी, आजारपण, शारीरिक कमतरता दूर होतात. या सर्व विकारांना प्रतिबंध घातला जातो. प्राथमिक स्वरुपातील या विकारांकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्यांचे रुपांतर जीवघेण्या रोग-व्याधीमध्ये होऊ शकते. हे सर्व टाळण्यासाठी तसेच प्रत्येकाची सूर्यनमस्कार साधना अखंडितपणे सुरू राहावी म्हणून ही अत्यंत उपयुक्त असलेली महत्त्वाची आश्वासक स्वयंसूचना आहे. सूर्यनमस्कार साधनेमध्ये खालील प्रकारचे सूर्यमंत्र व श्लोक म्हटले जातात. तक्ता क्र. सूर्यनमस्कार श्लोक व मंत्र पंधरा - सूर्यनमस्कार साधनेमध्ये अनेक प्रकारचे मंत्र व श्लोक येतात. त्यातील सूर्यनमस्कार एक साधना १६