पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कोणताच उद्देश नक्की न करता तुम्ही घराबाहेर पडला तर कोठेच पोहचणार नाही. पुढे सरकता येणार नाही. म्हणून कोणत्याही क्रियेपूर्वी संकल्प आवश्यक आहे. फलश्रुती श्लोक - आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वंति दिने दिने जन्मांतरसहस्त्रेषु दारिद्रयं नोपजायते ।। श्लोकाचा अर्थ जे दररोज नित्यनेमाने सूर्यनमस्काराचा सराव करतात त्यांना जन्मजन्मांतरी (आरोग्य, धनसंपत्ती, बुद्धी यांचे) दारिद्र्य येत नाही. - आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वंति दिने दिने आयु: प्रज्ञा बलं वीर्य तेजसतेषांच जायते । श्लोकाचा अर्थ जे दररोज नित्यनेमाने सूर्यनमस्काराचा सराव करतात ते दीर्घायुषी, विवेकी, बलवंत, कीर्तिवंत होतात. त्यांची यशोकीर्ति सूर्यप्रकाशासारखी तेजस्वी व सर्वदूर पसरते. आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वंति दिने दिने शक्तिर्बुद्धिमनस्तषां तेजो वीर्यंच वर्धते । श्लोकाचा अर्थ - जे दररोज नित्यनमाने सूर्यनमस्काराचा सराव करतात त्यांचे मन, बुद्धी, सामर्थ्य, पराक्रम सतत वर्धिष्णू असते. त्यांची यशोकीर्ति सूर्यप्रकाशासारखी तेजस्वी व सर्वदूर पसरते. विनता तनयो देव कर्मसाक्षी सुरेश्वर | सप्ताश्व: सप्तरज्जुश्च अरूणो में प्रसिदतु ।। विनता मातेचा पुत्र, माझ्या शरीराचा स्वामी, माझ्या सर्वकर्मांचा साक्षीदार, ईश्वरांचा ईश्वर, 5सात अश्व असलेल्या रथामध्ये आरूढ झालेल्या सूर्यनारायणाला मी वंदन करतो. या चारही श्लोकांचा मथितार्थ साधारणपणे एकच आहे. सूर्यनमस्काराच्या 5 सात अश्व व त्यांचे लगाम याचे इतरही अन्वयार्थ आहेत. सूर्यनमस्कार साधनेच्या संदर्भात शरीरातील सात उर्जाचक्रांचे संचलन करणारा असा अर्थ अभिप्रेत आहे. सूर्यनमस्कार एक साधना १५