पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ठिकाणी पूर्णांशाने एकाचवेळी उपस्थित असणारी शक्ती किंवा व्यक्ती म्हणजे विष्णू. या दैवी शक्तीचा उच्चार तीन वेळा केलेला आहे. पहिल्या उच्चारामध्ये परमेश्वराला आर्ततेने आवाहन केलेले आहे, दुसऱ्यामध्ये उत्साह आनंदाने परमेश्वराची स्थापना केलेली आहे, तिसऱ्या उच्चारामध्ये अंतःकरणपूर्वक त्याचा जयजयकार केलेला आहे. आपले शरीर पंचमहाभूतापासून अग्नी, वायू, आकाश, जल, पृथ्वी बनलेले आहे. हा शरीरपिंड 4 पंचकोशांत्मक आहे. सदा सर्वकाळ सर्व ठिकाणी पूर्णांशाने उपस्थित असणारे विष्णुतत्त्व / आत्माराम शरीर स्नायूतील प्रत्येक अणुरेणूमध्ये आहे. ज्याने पंचमहाभूते निर्माण केली त्यानेच आपले शरीर निर्माण केलेले आहे. शरीरातील पंचमहाभूतांवर आपला अधिकार नाही. आपल्या शरीराची संपूर्ण मालकी या परमतत्त्वाकडे आहे. यासाठी प्रत्येक विधी, क्रिया, कार्य हे धार्मिक असते. त्याला प्राणायामाचा आधार असतो. त्यातून या परमतत्त्वाची पूजा-आराधना केली जाते. - संकल्प श्लोकातील पुढील ओळ विशेष महत्वाची आहे. सूर्यनमस्कार ही साधना वैशिष्ट्यपूर्ण आहे. या वैशिष्ट्यपूर्ण साधनेचे विशेष हे आहे की ती अतिपुरातन कालापासून सातत्याने सुरू आहे. म्हणजे माझ्या आई-वडिलांनी, आजोबा-आजींनी त्यांच्या पूर्वजांनी ही साधना केलेली आहे. इतकेच नाही तर मी सुद्धा पूर्वजन्मांमध्ये सूर्यनमस्काराची साधना केलेली आहे. सूर्यनमस्कार हा माझ्या व्यक्तिमत्वाचा भाग आहे. माझ्या शरीराला आरोग्याचा लाभ मिळावा म्हणून आजच्या शुभदिनी मी आदित्यनारायणाला प्रिय असलेले सूर्यनमस्कार घालीत आहे.... हा सूर्यनमस्काराचा संकल्प आहे. सूर्यनमस्कार घालण्याचा ठाम निश्चय आहे. हा उच्चार म्हणजे स्वयं सूचना आहे. आपण करणार असलेल्या कार्यात मनाची साथ मिळावी हा उद्देश आहे. मनाने मनावर घेतले म्हणजे सर्व स्नायू सूर्यनमस्कारासाठी तयार होतात. संकल्पामुळे प्रत्येक क्रियेला ध्येय, उद्दिष्ट प्राप्त होते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. यातूनच काया, वाचा, मन व बुद्धि यांचा सहयोग मिळतो. उदाहरणार्थ 4 या पाच कोशांची नावे आहेत - अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोश सूर्यनमस्कार एक साधना १४