पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अद्यपूर्वोच्चारित एवंगुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ ।। मम शरीरे आरोग्यता प्राप्त्यर्थं श्रीसवितासूर्यनारायण प्रीत्यर्थं त्रिं 2 ( सूर्यनमस्कार संख्या / वेळ याचा उच्चार) सूर्यनमस्कारान् करिष्ये ।। आचमनाच्या कृतीमध्ये एक पळीभर पाणी हातावर घेऊन मुखामध्ये तीन वेळा सोडतात. सूर्यनमस्कार घालतांना शरीरात उष्णता तयार होते. आचमन केल्यामुळे घसा कोरडा होत नाही. तहान लागत नाही. घसा, अन्ननलिका स्वच्छ, मऊ, ओली राहते. त्यानंतर शरीरावरील चोवीस न्यासकेंद्रांना अंगठा - अनामिका - मधले बोट एकत्र करून स्पर्श करतात. स्पर्श करतांना त्या त्या न्यासकेंद्राच्या देवतांचा उच्चार करतात. प्रत्येक देवता विशिष्ट दैवीगुण समुच्चयाची आठवण करून देतात. न्यास केंद्र व सूर्यनमस्कार यांचा शरीर स्थरावर असलेला संबंध आपण प्रात्यक्षिक करतांना पहाणार आहोत. प्राणायाम म्हणजे दीर्घ-खोल श्वसन. आपली प्रत्येक लहान मोठी कृती प्राण तत्त्वावर बेतलेली असते. प्रत्येक धार्मिक विधीमध्ये प्राणायामाचा समावेश केलेला आहे. प्राणायाम केल्यामुळे विधी करण्यामध्ये मन एकाग्र होते. बुद्धी सतर्क होते. विधीमध्ये दिलेला आशय लक्षात घेऊन विधी केला जातो. कोणताही विधी करतांना आणि नंतरही प्राणायाम / दीर्घश्वसन अवश्य करा हाच संदेश यातून दिलेला आहे. सूर्यनमस्कार धार्मिक नित्यकर्म आहे. दीर्घ श्वसन हा त्याचा अंगभूत भाग आहे. दीर्घ श्वसनाचा सराव आपण प्रात्यक्षिकामध्ये स्वतंत्रपणे करणार आहोत. 3 विष्णू ही शक्ती आहे किंवा दैवी गुणसमुच्चय आहे. सदा सर्वकाळ सर्व 2 हे तीन सूर्यनमस्कार कसे घालायचे याच्या प्राथमिक सूचना ब्रह्मकर्मांर्तगत नित्यकर्म प्रथम दिवस, दैनिक सूर्यनमस्कार सराव सूचना - भाग दोन कार्यपुस्तिका यामध्ये बघा. यजमान जे धार्मिक विधी पुरोहिताकडून करून घेतात त्याचे निम्मे पुण्य पौराहित्य करणाऱ्याला मिळते असा संकेत आहे. हे निम्मे पुण्य म्हणजे मंत्रोच्चार करतांना जो सहज प्राणायाम होतो त्याचा फायदा किंवा पुण्य असाच असला पाहिजे. सूर्यनमस्कार एक साधना १३