पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मला पडलेले प्रश्न / सूर्यनमस्कार गूढतत्त्व आपण सूर्यनमस्कार संकल्प अनेकवेळा पुन्हा पुन्हा का करतो ? नव्याने सुरुवात करतांना पूर्वी आलेल्या अपयशांची खंत का नसते ? वारंवार सूर्यनमस्कार घालण्याची प्रेरणा का होते? ती कशाच्या आधारे होते? या आणि इतर अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळण्यासाठी सूर्यनमस्कार घालण्याचा विधी काय आहे याचा प्रथम विचार करावयास हवा. हा विधी साधारणपणे दोन भागांमध्ये विभागता येईल. अर्थात या दोन भागांचे स्वतंत्र अस्तित्व नाही. ते एकमेकांना पूरकच आहेत. एक भाग आहे श्लोक - मंत्र पठणाचा, दुसरा भाग प्रत्यक्ष कृतीचा एक भाग शिकण्याचा दुसरा भाग करून बघण्याचा. प्रत्यक्ष कृतीचा परिणाम स्थूल शरीरावर होतो. श्लोक - मंत्र पठणाचा परिणाम सूक्ष्म शरीरावर, मन- न-बुद्धीवर होतो. मन आणि बुद्धी विकसित होण्यास सुरुवात होते. सूर्यनमस्कार साधनेकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होतो. सूर्यनमस्काराची वैशिष्ट्ये लक्षात येतात. श्लोक-मंत्र यांचे परिवर्तन स्वयंसूचनेमध्ये होते. त्यामुळे साधनेमध्ये सातत्य येते. सातत्याने सूर्यनमस्कार घातले म्हणजे त्याचा शरीर-मन-बुद्धीवर अनुकूल परिणाम होतो. आपल्याला तो प्रकर्षाने जाणवतो. साधनेतील सातत्यातून श्रद्धा निर्माण होते. साधनेवर असणारी श्रद्धा व त्यामधील सातत्य यातून हळूहळू सूर्यनमस्काराचे सर्व फायदे मिळतात. . ● सुरुवातीला आपण प्रारंभाचे श्लोक व सूर्यनमस्काराचा सराव पूर्ण झाल्यानंतर म्हणावयाचे फलश्रुतीचे श्लोक यांचा विचार करू. तक्ता क्र. बारा, तेरा, चौदा - हा संकल्प श्लोक आहे. यामध्ये एखादी कृती करण्याचा निश्चय आहे. आपण करत असणारी ही कृती कोणती कशासाठी करायची - केव्हा करायची - - - किती वेळा करायची याचा थोडक्यात उल्लेख यात केलेला असतो. संकल्पाचा श्लोक म्हणजे शरीर-मनाला तयार रहाण्यासाठी दिलेली पूर्व सूचनाच आहे. संकल्पाचा श्लोक सूर्यनमस्कार एक साधना आचम्य प्राणानायम्य ।। विष्णुर्विष्णुर्विष्णुः ।। १२