पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ठिकाणी, सर्वकाळात, पूर्णांशाने सतत उपस्थित आहे. तो सर्व चराचर सृष्टीचे भरण, पोषण, संवर्धन करतो. या गटामधील लोक इतरांचा संसार चालवितात. त्यांना चरितार्थाचे साधन उपलब्ध करून देतात. आपल्याशी प्रामाणिक असणाऱ्यांची सर्वतोपरी काळजी घेतात. या गटातील सर्व लोक समाजमान्य, राजमान्य, प्रतिष्ठित असतात. समाजाचे पालन पोषण करणाऱ्या या लोकांनीसुद्धा बलोपासना केलीच पाहिजे. सूर्यनमस्कार नित्यकर्म म्हणून घातलेच पाहिजेत. सूर्यनारायण मध्यवर्ती स्थानावर आहे. त्याची पूजा तर अग्रक्रमाने करावयास हवी. या गटामध्ये असलेले लोक अंतिम सत्य, ब्रह्मानंद यांच्या शोधात निमग्न असतात. परमेश्वराचे वैश्विकरूप प्रत्येक चल अचल सृष्टीमध्ये पहाण्याचा प्रयत्न करतात. त्याची सेवा करतात, पूजा करतात. सर्व संत, महात्मे, शास्त्रज्ञ, शिक्षक, समाज शिक्षक हे या गटात येतात. या सर्वांनी बलोपासना केलीच पाहिजे. सूर्यनमस्कार नित्यकर्म म्हणून घातलेच पाहिजेत. सूर्यपंचायतन अनेक प्रकारचे आहेत. त्यामध्ये सूर्यनारायण मध्यवर्तीच असतो पण इतर देवतांमध्ये काही बदल बघावयास मिळतात. हा बदल प्रत्येकाचे आराध्य दैवत किंवा त्या आराध्य दैवताचा अवतार यावर अवलंबून असतो. इष्ट देवतांमध्ये फरक असला तरी दररोज पूजा करतांना संदेश मात्र एकच सर्वांनी सूर्यनमस्कार नित्यकर्म म्हणूनच घातलेच पाहिजेत. सूर्योदय, सूर्यास्त, पूजापाठ हे सूर्यनमस्काराची आठवण दररोज करून देतात. आदित्य - वार किंवा रवि- वार प्रत्येक आठवड्यात, सूर्याचे राशीसंक्रमण दर महिन्याला, रथसप्तमी प्रत्येक वर्षाला आपल्याला सूर्यनमस्काराचा संदेश देत असतात. प्रत्येक साडेसातीमध्ये तर धोक्याचा घंटानाद करून ही आठवण आपल्याला प्रकर्षाने करून दिली जाते. याचा उपयोग कितपत होतो हे ज्याचे त्याने बघायचे. तक्ता क्र. दहा स्वयंसाधना सूर्यनमस्कार काय आहेत, ते कसे घालायचे हे सर्वांना माहीत आहे. मी तुम्हाला सूर्यनमस्कार शिकविणार नाही. हा विषय शिकविण्याचा नाही शिकण्याचा आहे. सूर्यनमस्कार कोणीच कोणाला शिकवू शकत नाही. कारण सूर्यनमस्कार एक साधना - १०