पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चरितार्थाचे साधन लक्षात घेऊन जगाची लोकसंख्या या पाच गटामध्ये विभागता येते. देवघरातील सूर्यपंचायतनाचा अध्यात्मिक भाग थोडावेळ बाजूला ठेऊ. त्यातून सूर्योपासनेचा पर्यायाने सूर्यनमस्काराचा संदेश आपल्याला काय मिळतो, त्याकडे लक्ष देऊ. सूर्यपंचायतानामध्ये सूर्यदेव हा मध्यवर्ती आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. कारण सूर्यनारायण हा || सूर्य आत्मा जगत तत्सुस्थषश्च ।। असा आहे. सूर्योपासना हा दिनक्रमाचा श्रीगणेश: आहे. गणपती ही विद्येची देवता. जे लोक बुद्धी हेच वैभव मानतात, विद्या हीच शक्ती मानतात, विद्या-बुद्धी असल्यास सर्व सुखाची प्राप्ती होते असा ज्यांचा विश्वास आहे, जे बुद्धीजीवी आहेत ते सर्व या गटामध्ये येतात. त्यांनी सूर्यनारायणाला म्हणजेच सूर्योपासनेला प्राधान्य दिले पाहिजे, बलोपासना सूर्यनमस्कार नित्यकर्म म्हणून घातलेच पाहिजेत. त्रिशूल हे शक्ति - सामर्थ्याचे प्रतिक आहे. हेच आदिमाता, आदिशक्ती, कुलदेवता यांचे रूप आहे. या गटातील लोक शक्ती हीच एकमेव संपत्ती मानतात. शक्ती- सामर्थ्य यांच्या माध्यमातून सत्ता संपत्ती व सत्तेतून पुन्हा सामर्थ्य हा यांचा जीवनक्रम असतो. हे तलवारीवर जगणारे वीरपुरूष असतात. यांनी बलोपासना केलीच पाहिजे. सूर्यनमस्कार नित्यकर्म म्हणून घातलेच पाहिजेत. - डमरू म्हणजे रुद्र. भोलेनाथांचा रुद्रावतार, तांडवनृत्य यांची आठवण लगेच होते. रूद्र, महारूद्र, रूद्रगण किंवा मरूत, मतगण मारूती सर्वच गण डमरूच्या तालावर नाचत असतात. या गटामध्ये आमजनता सामावलेली आहे. जनता भोळी आहे. भोलेनाथांचे रूप आहे. पण तिने तांडव सुरू केल्यास होत्याचे नव्हते' होण्यास वेळ लागत नाही. हा गट फार मोठा आहे. तो वर्षाचे तीनशे- पासष्ठ दिवस व दिवसाचे चोवीस तास सतत सातत्याने कार्यरत असतो. जनसेवा हीच जनादर्नाची पूजा हे ध्येय घेऊन तो आपले चरितार्थाचे साधन स्वीकारतो. रामराज्याला पूरक असलेले (राम) राजकारण करतो. सामाजिक बदलाला कारणीभूत ठरतो. या सर्वांनी बलोपासना केलीच पाहिजे. सूर्यनमस्कार नित्यकर्म म्हणून घातलेच पाहिजेत. " मोराचे पीस भगवान श्रीकृष्णाचे प्रतिक आहे. तो एकाच वेळी सर्व सूर्यनमस्कार एक साधना ०९