पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भूक मारण्याचा किंवा झोप टाळण्याचा अधिक काळ प्रयत्न लांबविल्यास निसर्ग आपल्याला शारीरिक शिक्षा देतो. उदाहरणार्थ माझ्यावर काही जबाबदारीचे काम सोपविलेले आहे. त्या कामाचे स्वरूप व कार्यवाही याबद्दल काही महत्वाच्या सूचना देणे सुरू आहे. त्याचवेळी मला खूपच भूक लागलेली आहे. माझे सर्व लक्ष भूक या नैसर्गिक गरजेकडे आहे. या भुकेमुळे समोरच्याचे बोलणेच ऐकू येत नाही तर त्या सूचनांचा अर्थ समजणार कसा आणि त्या आमलात आणणार कोण? माझ्या कामाचे तीन-तेरा वाजणार. मला व माझ्या सहकाऱ्यांना अपयश येणार. त्याचा परिणाम इतर संबंधितांवरही होणारच. झोप न घेता दिवसरात्र ड्रायव्हिंग करणे अशक्य आहे. हट्टाने करण्याचा प्रयत्न केल्यास गाडीच्या आतील तसेच बाहेरील सर्वांना शिक्षा मिळणारच. चूक ड्रायव्हरची, शिक्षा मात्र सर्वांना. यावरून स्पष्ट लक्षात येते की नित्यकर्म व्यवस्थितपणे केले नाही तर चूक करणाऱ्याला तसेच त्याच्या सर्व संबंधितांना त्याची शिक्षा ही होतेच होते. नित्यकर्माकडे दुर्लक्ष करणे हे धोकादायक आहे. सूर्यनमस्काराची तुलना श्वासोच्छ्वास या नित्यकर्माशी करा म्हणजे त्याचे महत्व लक्षात येईल. तक्ता क्र. नऊ विभाग एक पूर्वार्ध याची सुरुवात सूर्यपंचायतन या प्रतिकाने केलली आहे. www.suryanamaskar.info या संकेतस्थळावरील पुस्तकाचे (e-book) हे मुखपृष्ठ आहे. 1 आपण दररोज सूर्यपंचायतनाची पूजा करतो. यामध्ये सूर्यनारायण, गणेश, कुलदैवत, भोलेनाथ व भगवान विष्णू या पाच देवतांची पूजा असते. सूर्यदेवता अर्थात मध्यवर्ती असते. इतर देवता चार दिशांना असतात. या देवतांची प्रतिके वेगवेगळी आहेत. त्रिशूल हे प्रतिक आहे आदिशक्ती किंवा कुलदैवतेचे. डमरू हे प्रतिक आहे भोलेनाथ शिवशंभो यांचे. मोराचे पीस हे प्रतिक आहे भगवान विष्णूचे. प्रत्येक व्यक्तीचे आराध्य दैवत व त्या व्यक्तीचे - 1 आद्य शंकराचार्य इ. सन पूर्व ७८८-८२१ यांनी हिंदुधर्मातील सर्व शाखा, पंथ, संप्रदाय यांच्यात ऐक्यभाव निर्माण होण्यासाठी, हिंदुचे संघटन करण्यासाठी अद्वैत वादाचा प्रसार- प्रचार करण्यासाठी सूर्यपंचायतनाचा पुरस्कार केला. सूर्यनमस्कार एक साधना ०८