पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांना करता येतो. अशा सर्वव्यापी सूर्यनमस्कार साधनेचे किंवा सूर्योपासनेचे संदर्भ आपल्याला सर्व धार्मिक ग्रंथात आढळतात. वेद, शास्त्र, श्रृती, स्मृती, पुराण, उपनिषद, आरण्यके इत्यादी सर्व ग्रंथांमध्ये हे संदर्भ आहेत. त्या काळामध्ये प्रत्येकाने सूर्योपासनेचा किमान एकतरी प्रकार नित्यकर्म म्हणून स्विकारला असणार. कारण सूर्यनारायण हा सर्व चल-अचल सृष्टीचे पालन पोषण, संवर्धन, संचलन करणारा सुखदाता प्रत्यक्ष परमेश्वर आहे, हा त्यांचा अनुभव होता. आजही आपल्या मनामध्ये हा विश्वास ठाम आहे. पाच- दहा पानांचे नित्यपूजा पाठ पुस्तिकेमध्येही सूर्योपासनेचा किंवा सूर्यनमस्कार साधनेचा उल्लेख असतोच. ब्रह्मकर्मांतर्गत नित्य कर्म सूर्यनमस्कार तक्ता क्र. आठ एखादी क्रिया, कर्तव्य किंवा यज्ञ दररोज नित्य नेमाने सातत्याने केले जाते ते नित्यकर्म. सूर्यनमस्कार ब्रह्मकर्मांतर्गत असलेले नित्यकर्म आहे. ब्रह्माचे कार्याला पोषक असलेले कर्म आहे. ब्रह्मानंद देणारी उपासना आहे. ब्रह्मांडामध्ये सातत्याने उत्पत्ती-स्थिती-लय याचे मंडल सतत सुरू असते. हे तिन्ही कार्य अनुक्रमे ब्रह्मा-विष्णू-महेश यांचेकडे सोपविलेले आहेत. या कार्याला पूरक व पोषक असणारे प्रत्येक कार्य-कृती - उपासना म्हणजे ब्रह्मकर्म. वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास आपला स्वतःचा आणि इतर सर्व जीव सृष्टीचा जन्म - जीवन-मृत्यू सुखकर होण्यासाठी नित्य नेमाने करण्याचे कार्य म्हणजे ब्रह्मकर्मांतर्गत नित्य कर्म होय. या ब्रह्मकर्मामध्ये सूर्यनमस्कार साधनेचा समावेश होतो. या ब्रह्मकर्माची नित्य उपासना केल्याने तीनही स्थितीमध्ये 'स्वस्थ' राहता येते. स्वस्थ असणे म्हणजे आरोग्य-आनंदाची परिसीमाच असते. कारण या अवस्थेमध्ये अंत:करणातील परमतत्त्वाशी आपले सख्य झालेले असते. आपण ब्रह्मानंद अनुभवित असतो. - खाणे-पिणे, झोपणे याप्रमाणेच सूर्यनमस्कार हे नित्यकर्म आहे. झोप आली की मऊ उबदार बिछानाच पाहिजे असे काही नाही. दगडावरसुद्धा गाढ निद्रेचा अनुभव घेता येतो. भूक लागली की खाण्यालायक कोणताही पदार्थ चालतो. भूक भागते. झोप घेतल्याशिवाय राहवत नाही आणि भुकेपासून पळता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. ही दोन्ही नित्यकर्मे कोणालाच टाळता येत नाहीत. सूर्यनमस्कार एक साधना ०७