पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मार्गदर्शन करू शकतील. सूर्यनमस्कार प्रकार तक्ता सहा सूर्योपासनेचे अनेक प्रकार आहेत. कालांतराने त्यात हळूहळू बदल होत गेले. सूर्योपासनेतील प्रगतीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे सूर्यनमस्कार. यामध्ये स्थूलशरीराचा व सूक्ष्मशरीराचा वापर करून सूर्यनारायणाची प्रार्थना केलेली आहे. पंचप्राण, पंचमहाभूते, कर्मेन्द्रिये, ज्ञानेंद्रिये आणि शरीरातील पाच ऊर्जाचक्र यांचा वापर केलेला आहे. म्हणूनच सूर्यनमस्कार हा स्थूल शरीर व सूक्ष्म चैतन्य यांची पूजा आहे. सूर्यनमस्काराचे अनेक प्रकार आहेत समंत्रक सूर्यनमस्कार, बीजाक्षर सूर्यनमस्कार, तृचाकल्प सूर्यनमस्कार, हंसकल्प सूर्यनमस्कार, चांद्रनमस्कार, मानसिक सूर्यनमस्कार इत्यादी. तृचाकल्प सूर्यनमस्कारामध्ये ऋग्वेदातील तीन ऋचांचा वापर केला जातो. हंसकल्प सूर्यनमस्कारामध्ये यजुर्वेदातील एका ऋचेचा वापर केला जातो. या ऋचांच्या अर्थावरून आपल्या स्पष्टपणे लक्षात येते की, वेदकालात सूर्यनमस्कार शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्णपणे विकसित झालेला होता. विपरीत सूर्यनमस्काराची काही नावे आहेत - कृष्णी सूर्यनमस्कार, हनुमंती सूर्यनमस्कार, जाबुवंती सूर्यनमस्कार, जरासंघी सूर्यनमस्कार, रावणी सूर्यनमस्कार. हे सूर्यनमस्कार शिकण्यास अर्थातच अखंडित व दीर्घ साधनेची आवश्यकता असते. मल्लविद्या व द्वंदयुद्ध यामध्ये संरक्षण व आक्रमक डावपेचासाठी यांचा उपयोग केला जातो. तीन अंकामध्ये सूर्यनमस्कार घातले जातात. तसेच ते बारा व सोळा अंकामध्येही घातले जातात. गतीयुक्त सूर्यनमस्कार व नियंत्रीत सूर्यनमस्काराचा हा प्रकारही सर्वच पद्धतीमध्ये प्रचलित आहे. तक्ता सात सूर्यनमस्कार हा मुख्य व्यायाम (Main Exercise), शरीरसंचलनासाठी व्यायाम (Warming up Exercise), किंवा व्यायाम झाल्यानंतर स्नायू शांत (Cooling Exercise), करण्याचा प्रकार अशा तिन्ही प्रकारात करता येतो. तो सूर्यनमस्कार एक साधना ०६