पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चरणी आजचा सूर्यनमस्कार यज्ञ अर्पण करतो. समर्थांना केलेला हा प्रणाम व अर्पण केलेला प्रसाद छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहचतो. या दोन्ही महामानवांचे अंतीम ध्येय एकच आहे सर्वांना सर्व बंधनातून मुक्त करणे, रामराज्याची- स्वराज्याची हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे. - सूर्यनमस्कार म्हणजे स्थूल शरीर व सूक्ष्म चैतन्य यांची पूजा आहे. या विधानाची थोडक्यात माहिती आज आपण घेणार आहोत. त्यासाठी शरीर शास्त्राची थोडी उजळणी व सूक्ष्म चैतन्याची शरीर स्तरावर काही प्रचिती घेता येते कां ते पाहणार आहोत. या अनुभूतीतून आपल्याला सूर्यनमस्काराचे धार्मिक अधिष्ठान काय आहे हे लक्षात येईल. धार्मिक अधिष्ठान एकदा लक्षात आल्यावर सूर्यनमस्कारातील सराव सातत्याने सुरू ठेवण्याच्या तुमच्या निर्णयाला मनाची साथ नक्की मिळेल. एकदा मनाने मनावर घेतल्यास सर्वकाही सहज शक्य होते हे वेगळे सांगायची गरज नाही. आजच्या आधुनिक काळामध्ये धकाधकीचे जीवन, धावपळ, जीवघेणी स्पर्धा, अशांतता, अस्थिरता, भय यांचा धुमाकूळ चालू आहे. सर्वत्र यांचेच राज्य चालू आहे. भये व्यापले सर्व ब्रह्मांड आहे। सर्वांनाच भयगंडाने ग्रासले आहे. क दाचित म्हणूनच आज सर्व समाजमन धार्मिकतेकडे झुकते आहे. प्रत्येक व्यक्ती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे धर्मकृत्यामध्ये सहभागी होते आहे. भयातीत होण्यासाठी आधार शोधते आहे. सूर्यनमस्कार नित्यकर्म साधना आहे. त्याचे धार्मिक अधिष्ठान आपल्या लक्षात आल्यावर सूर्यनमस्कार साधना प्रत्येकाच्या दिनचर्येचा आधार होईल. भय, काळजी, चिंता, शोक यामुळे होणारे व्याधी - विकार-व्यसन दूर होतील. शारीरिक, मानसिक आरोग्य सुधारेल. अकाल मृत्यूचे भय राहणार नाही. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. जया पाहता द्वंद्व काही दिसेना भयो मानसी सर्वथाही असेना ।। आदित्य वंशावतंस प्रभुरामचंद्रांच्या उपासनेमुळे सर्वजण शारीरिक व मानसिक दृष्टीने आरोग्य संपन्न होतील. या पृथ्वीचे नंदनवन करण्यासाठी जगाला सूर्यनमस्कार एक साधना ०५