पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मन-बुद्धी पटलावर काय येतो त्याकडे लक्ष द्या. पाच दिवसांचा सूर्यनमस्कार- प्राणायाम प्रशिक्षण वर्ग पूर्ण झाल्यावर या श्लोकाचा अर्थ अधिक प्रकाशमान होईल. सूर्यनमस्कार साधनेमध्ये गुरुसत्तेचा अनुभव दररोज अधिकाधिक स्पष्ट होत जाईल. तो स्वीकारण्यासाठी कान- डोळे सतत उघडे ठेवा. सद्गुरू वंदन ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वंद्वातीतं गगनसदृशम् तत्त्वमस्यादि लक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् । भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ।। तक्ता एक तक्ता दोन तक्ता तीन तक्ता चार तुम्हा सर्वांना स्वतंत्रपणे आणि व्यक्तिश: प्रणाम तुमच्या सर्वांच्या अंत:करणातील सूर्यतेजाला साष्टांग प्रणिपात. हे सूर्यतेज किंवा आत्मतेज विश्वामध्ये सर्वत्र एकच आहे. चल व अचल सृष्टीमध्ये ते एकच आहे. तुमच्यामध्ये असलेले प्राणतत्त्व तेच माझ्यामध्येही आहे. याला अनेक नावांनी ओळखले जाते. आद्या, आदिशक्ती, प्राणशक्ती, वैश्विकशक्ती, हिरण्यगर्भ, परमेश्वर, गॉड, अल्ला इत्यादी. सद्गुरू समर्थ रामदास स्वामी याला आत्माराम किंवा जगत्ज्योती या नावाने संबोधतात. - - तक्ता पाच ग्रंथराज दासबोधाचे पठण करण्यापूर्वी समर्थ रामदास स्वामी विश्वाच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरलेल्या या जगत्ज्योतीची तुलना गणेश, सरस्वती, सद्गुरू प्रभुरामचंद्र, आदिशक्ती आणि सर्व इष्टदेवतांशी करतात. तिची प्रार्थना करतात. - गणेशशारदा चैव सद् गुरु सज्जन स्तथा। आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन ।। दासबोध पारायण प्रारंभाष्टक सूर्यनमस्काराचा अभ्यास किंवा सराव समर्थ रामदास स्वामींचे स्मरण केल्याशिवाय अपूर्ण आहे. त्यांना प्रथम मनोभावे साष्टांग नमस्कार घालतो. त्यांचे सूर्यनमस्कार एक साधना ०४