पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मिळविण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. हा मार्ग निश्चितपणे आपल्या मनोकामना पूर्ण करणारा आहे. याची खात्री होते. साधक साधनेत एकरूप होतो. आज काळ बदललेला आहे. तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होते आहे. काळ-काम-वेग तिन्ही संकल्पना संकुचित झालेल्या आहे. 'प्रथम चमत्कार मग नमस्कार' ही आजची रीत आहे. कोणतीही वस्तू, मग ती कृती असो किंवा संकल्पना, त्याची संपूर्ण माहिती आणि उपयुक्तता प्रथम निश्चित केली जाते. तौलनिक अभ्यास केला जातो. फायदे कोणते व किती वेळात हा निकष लावूनच साधनेचा स्वीकार केला जातो. उपासनेची सुरुवातच साधनेची परीक्षा घेण्याच्या हेतुने सुरू होते. परीक्षेची तयारी न करता साधक प्रश्नपत्रिका कशीबशी सोडवितो. परिणामासाठी मात्र अधिर झालेला असतो. विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण होण्याची अपेक्षा ठेऊन असतो. अपेक्षित यश मिळाले नाही की या परीक्षेला सोडचिठ्ठी देतो. नवीन अभ्यासक्रम निवडतो. पुन्हा एकदा आपल्याला हवे असलेले परिणाम मिळविण्यासाठी नव्याने सुरुवात करतो. या धरसोड वृत्तीमध्ये विद्यार्थीदशा केव्हा संपते ते कळतच नाही. सूर्यनमस्कार साधना एकाग्र चित्ताने अखंडितपणे सुरू राहण्यासाठी प्रथम साधक बना. ही साधना शिकण्यासाठी तुमच्या आत्मारामाला समर्पण बुध्दीने शरण जा. त्याने शिकविलेल्या साधनेमध्ये, त्यानीच घेतलेल्या परीक्षेमध्ये, त्याच्याच आशीर्वादाने दररोज विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण होण्याचा ब्रह्मानंद मिळवा. हे सोपे काम अधिक सोपे करण्यासाठी माझे अनुभव शब्दबद्ध करतो आहे. अव्यक्त संकल्पना शब्दातीत असते. तिचे सर्वसाधारण ढोबळ रूप व्यक्त करण्यासाठी फक्त शब्दांचा आधार घेता येतो. त्याची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजेच ज्ञान. ते मिळविण्यासाठी साधनेचा सराव हा एकच राजमार्ग आहे. विचार आणि अनुभव शब्दात व्यक्त करण्याचा माझा प्रयत्न विसरून जा. साधना प्रत्यक्ष आचरणात आणून तुम्हाला कोणते अनुभव मिळतात याकडे लक्ष ठेवा. प्रथम सद्गुरुला वंदन करून आपल्या विषयाला सुरुवात करू. श्रीमत् ग्रंथराज दासबोधाचे पारायण मंगलाचरणाने सुरू होते. यामध्ये गुरू महिमा वर्णन केलेला आहे. हा श्लोक गुरुगीतेतला आहे. गुरुगीता हा स्कंधपुराणातला (महर्षी व्यासकृत) एक महत्वाचा भाग आहे. या श्लोकातील एक-एक शब्द मी सावकाश उचारतो. तुम्ही त्या शब्दाचा उच्चार माझ्या मागून मनात करा. त्या शब्दाचा अर्थ सूर्यनमस्कार एक साधना ०३