पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रमुख तीन उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे शब्दांकन केलेले आहे. १) सूर्यनमस्कार ही अलौकिक साधना आहे हे स्पष्ट करणे. २) ही साधना नित्यनेमाने सुरू करण्यासाठी मनाने मनावर घ्यावे यासाठी प्रयत्न करणे. ३) सूर्यनमस्कार अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी मार्गदर्शन करणे. पूर्वार्ध या भागात प्रथम उद्दिष्ट स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. हे स्पष्टीकरण मुद्देसूद - संक्षिप्त परिणामकारक व्हावे म्हणून छायाचित्रांचा (Power Point Presenta- tion, slides forty two) वापर केलेला आहे. प्रत्येक चित्र दाखवून त्याबद्दल उद्दिष्टानुरूप थोडक्यात माहिती दिलेली आहे. - सूर्यनमस्कार ही एक स्वयंसाधना आहे. ती आपल्या 'स्व'कडून शिकायची कशी याची माहिती कृतीपुस्तिकेत दिलेली आहे. योग्य पध्दतीने सूर्यनमस्कार आपल्याला घालता येतात व सूर्यनमस्काराचे सर्व फायदे आपल्याला दीर्घ सरावातून निश्चितपणे प्राप्त होतात याची खात्री झाल्यावर सूर्यनमस्कार मनापासून स्वीकारले जातात. त्याला बुद्धीची जोड मिळते. ती स्वतःची साधना होते. मन आणि बुद्धि शरीराला कार्यप्रवृत्त करतात. तुमच्या प्रयत्नांना शरीर पूर्णपणे साथ देते. साधना आपोआप सिद्ध होते. व्यक्तीगत साधना सिद्ध होणे म्हणजे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होणे असा होतो. याचे स्पष्टिकरण उत्तरार्धात दिलेले आहे. साधनेमध्ये सातत्य टिकविणे सर्वात महत्वाचे असते. सूर्यनमस्कार पद्धतशीरपणे घातले नाहीत तर विपरीत अनुभव येतात. स्नायूक्षोभ होतो. मनात अनेक शंका-कुशंका येतात. साशंक मन सूर्यनमस्कार साधनेत एक-अग्र होत नाही. मनावर काजळी धरली जाते. पर्यायाने साधना खंडित होण्याचा धोका निर्माण होतो. उत्तरार्ध या भागात हे शंकापटल दूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शंकासमाधान करण्यास प्रथम प्राधान्य दिलेले आहे. साधनेत अधिक प्रगती करण्याचे इतर मार्गही विस्ताराने दिलेले आहेत. गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये नित्यनेमाने कर्म करा, साधना उपासना सातत्याने करा. हा अध्ययनाचा प्रथम सिध्दांत होता. नित्यकर्मातून साधनेमध्ये एकाग्रता येते. या कर्मयोगातून हळूहळू साधनेतील भक्ती केव्हा सुरू होते लक्षातही येत नाही. कर्मयोग व भक्तीयोग हा ज्ञानप्राप्तीचा म्हणजेच प्रत्यक्ष अनुभूती सूर्यनमस्कार एक साधना ०२