पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट - ९ - खर्डेकर सुभाष भगवंतराव बी.ए; बी. एड्; एम.ए. सूर्यनमस्कार साधक. सेवा निवृत्त उपप्रचार्य (श्री.डी.डी. बिटको बॉईज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, नासिक) निवृत्ती नंतर स्वयंघोषित सूर्यनमस्कार पूर्णवेळ कार्यकर्ता. विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार साधनेत मार्गदर्शन करण्याच्या हेतुने www.suryanamaskar.info हे संकेतस्थळ विकसीत केले. संकेतस्थळ मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रसिद्ध केलेले आहे. ते सर्वांसाठी विनामूल्य आहे. बहि:शाल शिक्षण मंडल, पुणे विद्यापीठ, पुणे यांनी सूर्यनमस्कार व आरोग्य या विषयाचा व्याख्याता म्हणून मान्यता दिलेली आहे. संकेतस्थळाला देश-परदेशामधून उदंड प्रतिसाद मिळतो आहे. सूर्यनमस्कार स्वयंसाधना शिकणे व इतरांना समजावून सांगणे हे सातत्याने गेली दहा वर्षे सुरू आहे. या देवाण-घेवाणीतून माझी साधना समृद्ध होते आहे. दररोज पंधरा मिनिटे सूर्यनमस्कार साधनेसाठी दिल्यास आनंददायी आरोग्याचे संवर्धन व संरक्षण होते हा संदेश प्रभावी पद्धतीने सर्वदूर देण्यासाठी श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक या विश्वस्त संस्थेची स्थापना केली. सूर्यनमस्कार एक साधना ३२८