पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यनमस्कार व संस्कृत भाषा हे कार्याचे अधिष्ठान ठेवून सर्व वयोगटातील स्त्री-पुरूषांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय विद्या-कला-क्रीडा यांचा प्रचार प्रसार करणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. प्रत्येकाला सूर्यनमस्कार (स्वयं ) साधना शिकवण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या कार्यपुस्तिकेचा प्राथमिक उद्देश आहे. प्रत्येक साधकाने सूर्यनमस्कार कार्यकर्ता व्हावे हा याचा प्रगत हेतू आहे. समृद्ध - संपन्न भारत, विश्वविजयी भारत हे स्वप्न प्रत्येकाने पहावे, ते साकार करण्यासाठी सर्व भारतीयांनी सूर्यनमस्कार यज्ञ दररोज करावा हे याचे अंतिम लक्ष आहे. कुटुंबातील एकानेच समृद्धीचे स्वप्न बधितले तर ते दिवा स्वप्न होते. पण एकच स्वप्न कुटुंबातील सर्व सदस्यांनी बघितले तर ते स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्याची सुरूवात असते. आपणही या यज्ञात सहभागी होऊन दररोज आहुती टाकणार आहात. आपल्या अंतःकरणातील सूर्यतेजाला, आत्मारामाला सर्वभावे साष्टांग नमस्कार.. ॥जय जय रघुवीर समर्थ ।। सूर्यनमस्कार एक साधना ३२९