पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तयासी तूळणा कोठे मेरूमंदार धाकुटे ।।११।। ब्रह्मांडाभोवते वेढे वज्रपुच्छे घालु शके तयासी तूळणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे ||१२|| आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा। वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा ||१३|| धनधान्य पशूवृद्धि पुत्र पौत्र समग्रही पावती रुपविद्यादि स्तोत्र पाठे करुनिया ।।१४।। भूतप्रेतसमंधादि रोगव्याधि समस्तही नासती तूटती चिंता आनंदे भीमदर्शने ||१५|| हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्रकलागुणे ||१६|| रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडणू रामरुपी अंतरात्मा दर्शने दोष नासती ।।१७।। इतिश्री रामदासकृतं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् । ू श्रीसूर्यनमस्कार नामावळी 4 ' अदीत्योयनमः दीवाकरयनमः भास्करायनमः प्रभाकरयनमः हे शब्द खाली दिल्याप्रमाणे वाचा- आदित्याय नमः । दिवाकराय नमः। प्रभाकराय नमः। सहस्त्रांशवे नमः। त्रिलोक्यलोचनाय नमः। हारिदश्चाय नमः । दिनकरप्रोक्ताय नमः । त्रिमूर्तये नमः।। सूर्याय नमः ।। सूर्यनमस्कार एक साधना ३२५