पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री भीमरूपी स्तोत्र भीमरुपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ।।१।। महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका ||२|| दिनानाथा हरिरुपा सुंदरा जगदंतरा पाताळदेवताहंता भव्य सेंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परतोषका।।४।। ध्वजांगे उचले बाहु आवेशे लोटिला पुढे काळाग्नी काळा रुद्राग्नी देखता कापती भये ||५|| ब्रम्हांड माईला नेणो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भृकूटी त्राहटिल्या बळे।। पुच्छ ते मुरडिले माथा किरिटीकुंडले बरी सुवर्ण कटी कासोटी घंटा किंकिणी नागरा ||७|| ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लतेपरी ||८|| कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्राद्रीसारिखा द्रोणु क्रोधे उत्पाटिला बळे ।।९।। आणिला मागुता नेला गेला आला मनोगती मनासी टाकिले मागे गतीस तूळणा नसे ।।१०।। अणू पासूनि ब्रह्मांडा एवढा होत जातसे सूर्यनमस्कार एक साधना ३२४