पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्यनारायण मानवाचे पहिले दैवत. त्याचे अखंड मनन-पूजन-चिंतन यातून सूर्योपासनेचे अनेक प्रकार अस्तित्वात आले. वेदकालामध्ये सूर्योपासनेचा परिपूर्ण विकास झालेला होता. सूर्योदय व सूर्यास्त या काळातील शांत-प्रसन्न सूर्य ब्रह्मा-विष्णू रूपाने नटला आणि माध्याह्न तेज, रुद्र रुपाने ओळखले जाऊ लागले. सूर्योपासनेचा अंगीकार वैष्णव, शीव व सौर पंथियांनी स्वीकारला. सूर्योपासना प्रत्येक घरात पोहचली. श्रीशिवप्रोक्त सूर्याष्टक यामध्ये सूर्यनारायणाची स्तुती व महिमा वर्णन केलेला आहे. विशेष म्हणजे आरोग्य-सुख-समृद्धी यांचे रक्षण करण्यासाठी आहारातील काही पथ्य सांगितलेले आहेत. आधुनिक वैद्यक शास्त्रात आजही त्यांचा सर्रास पुरस्कार केला जातो. श्रीशिवप्रोक्त सूर्याष्टक श्रीगणेशाय नमः ।। सांब उवाच ॥ आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोऽस्तु ते ||१|| सप्ताश्वरथमारूढं प्रचण्डं कश्यपात्मजम् श्वेतपद्मधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ||२|| लोहितं रथमारूढं सर्वलोकपितामहम् महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ||३|| त्रैगुण्यं च महाशूरं ब्रह्माविष्णुमहेश्वरम् महापापहरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ||४|| बृहितं तेजःपुंजं च वायुमाकाशमेव च प्रभुं च सर्व लाकानां तं सूर्यं प्रणमाम्यहम् ||५|| बंधूकपुष्पसंकाशं हारकुंडलभूषितम् एकचक्रधरं देवं तं सूर्यं प्रणमाम्यहम् ॥ ६ ॥ सूर्यनमस्कार एक साधना ३२१