पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट- ०७ ।। श्रीरामसमर्थ ।। शक्ती उपासना स्तोत्र - मंत्र - सूर्य जपमंत्र - ॐ आदित्याय विद्महे सहस्त्रकिरणाय धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात् । आरोग्यासाठी प्रार्थना- आरोग्यं भास्करादिच्छेत् धनमिच्छेद हुताशनात्। ज्ञानं महेश्वरादिच्छेत् मुक्तिमिच्छेज्जनार्दनात्।। स्मृतिरत्नाकर, मत्स्यपुराण ६७/७१ श्लोकाचा अर्थ- आरोग्यासाठी सूर्यनारायणाची प्रार्थना करावी. धनासाठी अग्नीची, ज्ञानासाठी महेश्वराची तर मुक्तीसाठी विष्णूची प्रार्थना करावी. उदक कुम्भाय नमः उदककुंभ म्हणजे पाण्याने भरलेला मातीचा घट किंवा भांडे. धार्मिक विधी सुरू करण्यापूर्वी घटाचे पूजन केले जाते. घटाकाशात असलेल्या पंचमहाभूतांना वंदन केले जाते. आपले शरीरही पंचमहाभूतांचेच आहे. म्हणून शरीराला घटाची उपमा दिली जाते. ते एक मातीचे मडके आहे. हे मडके सूर्यतेजामध्ये, योगाग्निमध्ये पक्के भाजून घ्या. स्वच्छ शुद्ध करून घ्या. त्यावर सुवर्णाची झळाळी येवू द्या. हे सुवर्ण-सूर्यकवच आपल्या आरोग्याचे रक्षण करणारे आहे. या देहरुपी मडक्याची, घटाकाशाची काळजी घेणे म्हणजेच आपल्या कुलदेवतेची, आराध्य दैवताची, इष्टदेवतांची पूजा करणे होय. शरीरामधील या देवता कोणत्या हे खालील प्रार्थनेमध्ये सांगितलेले आहे. ॐ कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रः समाश्रितः। मूलेत्वस्य स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणाःस्मृताः।। सूर्यनमस्कार एक साधना ३१६