पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा । ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणा ।। अंगैश्च सहिताः सर्वे कलशं तु समाश्रिताः। अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा ।। सर्वे समुद्राः सरितस्तीर्थानि जलदा नदाः । आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः।। गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति । नर्मदे सिन्धु कावेरि जलेऽस्मिन् संनिधिं कुरू।। त्वत्प्रसादादिमं यज्ञं कर्तुमीहे जलोद्भव। सांनिध्यं कुरू मे देव प्रसन्नो भव सर्वदा ।। आदित्यहृदय स्तोत्र सुष्ट आणि दुष्ट यामधील संघर्ष अनादी कालापासून सुरू आहे. वाल्मीकी रामायणात ‘युद्धकांड’ या प्रकरणामध्ये हा संघर्ष वर्णन केलेला आहे. या भागात हे आदित्यहृदय स्तोत्र आलेले आहे. राम आणि रावण यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. प्रभुरामचंद्र युद्धभूमिवर संचित अवस्थेत आहेत. त्यावेळी अगस्तीऋषी प्रभुरामचंद्रांकडे जातात. त्यांना सनातन सत्य कथन करतात. ते सांगतात, ‘‘सूर्यनारायणाचे स्मरण करून युद्ध कर. या क्षणी तू विजयी होशील’’. पर्याप्तपणे सूर्यनारायणाचे सामर्थ्य व सूर्योपासनेचा महिमा या स्तोत्रामध्ये सांगितलेला आहे. सूर्योपासना करणारे साधक पापवृत्ती व पापबुद्धी नष्ट करतात. 'स्व' चे राज्य प्रस्थापित करतात. रामराज्याची गुढी उभारतात. हेच सनातन शाश्वत सत्य आहे. सूर्यनमस्कार एक साधना ३१७