पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्यक्षतेखाली आणि सूर्यनमस्कार जागतिक विक्रम प्रस्थापित करणारे करवीर निवासी माननीय श्री. युवराज बाबुराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. प्रशिक्षण व मार्गदर्शन श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक www.suryanamaskar.info यांनी केले. संस्कृत भाषा सर्व भाषांची जननी आहे. सर्वश्रेष्ठ भाषा आहे. प्रत्येक संस्कृत वाक्याचा अर्थ व व्याकरण वैशिष्ट्यपूर्ण आहे. संगणकासाठी उपयुक्त समजली जाणारी भाषा आहे. संस्कृत उच्चारात वाक्इंद्रियांमधील सर्व प्रमुख रक्त वाहिन्यांचा उपयोग केला जातो. हे सर्व अनन्यसाधारण गुण या भाषेमध्ये असूनही तिचा बोलीवापर कमी होतो आहे. किती लोक ही भाषा वापरतात या टक्केवारीत तिची अधोगती झपाट्याने होते आहे. आज वेद पाठशाळेमध्ये संस्कृत भाषेचे शिक्षण दिले जाते. शालेय अभ्यासक्रमामध्ये संस्कृत हा वैकल्पिक भाषाविषय फक्त कागदावरच आहे. संस्कृत विषय शिकविण्यासाठी शिक्षक मिळत नाही म्हणून, काही अपवाद वगळता, सर्वच शाळांमधून हा विषय बंद करण्यात आलेला आहे. आपल्या पाल्याच्या शाळेमध्ये संस्कृत शिकविण्याची सोय नाही ही पालकांच्या मनात खंत आहे! संस्कृत अभ्यासकांना भाषेच्या अस्तित्वाची चिंता आहे!! काही देशांमध्ये पहिली ते पाचवी इयत्तेपर्यंत संस्कृत भाषा अनिवार्य आहे याचे सर्वं सामान्यांना आश्चर्य आहे!!! इयत्ता दहावी / बारावीच्या विद्यार्थाला एखाद्या विषयाचा अभ्यास घरी करून तो विषय बोर्डाच्या परीक्षेत निवडता येतो. पण मार्गदर्शनाचा अभाव असल्याने या सुविधा फक्त नियमावलीत पडून राहतात. संस्कृत भाषेचा शालेय अभ्यासक्रम पूर्णकरून घेणारे भाषा सेवा केंद्र सुरू करणे. या भाषा सेवा केंद्राची व्याप्ती वाढविणे. संस्कृत विषय शिकण्याची इच्छा असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ही सेवा पुरविणे हा उपक्रम संस्थेने हाती घेतलेला आहे. त्यासाठी विषय मार्गदर्शक व कार्यकर्ते यांची नितांत जरुरी आहे. कोणत्याही संस्थाकार्याचा प्रसार व प्रभाव त्या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर सूर्यनमस्कार एक साधना ३०९