पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

‘वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्वासाठी' चाललेली धडपड जवळून बघावयास मिळते. आजकाल दमछाक करणारी धावपळ व जीवघेणी स्पर्धा हा प्रत्येक दिवसाचा अविभाज्य घटक झालेला आहे. त्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी सर्व वयोगटातील स्त्रि-पुरूषांना सूर्यनमस्काराची आवश्यकता आहे हे प्रकर्षाने जाणवते. या साधनेबद्दल असलेली समाजातील सर्वसमावेशक उत्सुकतासुद्धा पदोपदी ठळकपणे लक्षात येते. • सूर्यनमस्कार साधना म्हणून स्वीकारल्यास त्यामधील सातत्य सहजपणे टिकून राहते. श्रद्धा-सातत्य - सबुरी यातून सूर्यनमस्काराचे सर्व लाभ मिळतात. अकाल मृत्यू हरणम् सर्वव्याधी विनाशनम्।। याची प्रत्यक्ष अनुभूती मिळते. ही स्वयं साधना आत्मारामाकडून शिकण्यासाठी मनाने शरीराला तयार केले पाहिजे. ही प्राथमिक तयारी करून घेण्यासाठी त्याला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. हे प्रशिक्षण देण्यासाठी सूर्यनमस्कार साधक आणि कार्यकर्ते यांची आवश्यकता आहे. ही कार्यकर्त्यांची कार्यशाळा घराघरातून सुरू होण्यासाठी कायमस्वरुपी सूर्यनमस्कार संस्था स्थापन करावी असा आग्रह होत होता. गुरूपौर्णिमा २५ जुलै २०१० या दिवशी आम्ही काही सूर्यनमस्कार साधक व समर्थभक्त एकत्र आलो. या शुभमुहूर्तावर विश्वस्थ संस्था स्थापन करण्याचा संकल्प उच्चारला. सूर्यनमस्कार साधना व संस्कृत भाषा हे संस्थेच्या कार्याचे अधिष्ठान ठेऊन सर्व वयोगटातील, तसेच सर्व जाती-धर्म-पंथ-भाषा-प्रदेश यामधील स्त्रीपुरूष यांच्या मन-मनगट-बुद्धी यांचा सर्वांगीण विकास करणे. ना नफा ना तोटा या तत्वावर भारतीय पुरातन विद्या-कला-क्रीडा यांचा प्रचार प्रसार करणे. हे संस्थेचे उद्दिष्ट नक्की केले. जाहिर करण्यास आनंद होतो की श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक (एफ ११९३४) नासिक या संस्थेचा आज प्रथम वर्धापनदिन आहे. रथसप्तमी २०११ या निमित्ताने संस्थेने (विनामूल्य) सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण यज्ञ गंगाघाट नासिक येथे ६ ते १० फेब्रुवारी २०११ आयोजित केला होता. उद्घाटन समारंभ समर्थवंशज माननीय परमपूज्य श्री. भूषण स्वामी महाराज श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड (सातारा) यांच्या सूर्यनमस्कार एक साधना ३०८