पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अवलंबून असतो. ही कार्यकर्त्यांची गरज अंशतः भागविण्यासाठी सूर्यनमस्कार एक साधना, कार्यपुस्तिका (साधकांसाठी) या नावाचे कृतीपुस्तक संस्थेतर्फे लवकरच प्रसिद्ध होते आहे. गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने समर्थांचा पहिला मठ श्री मारुती देवस्थान, आगर टाकळी नासिक येथे आज या संकल्पाचा उच्चार करतो आहे. या कार्यपुस्तकाची अनुक्रमणिका व विषय मांडणी वाचल्यावर याची उपयुक्तता लक्षात येईल. पुस्तकाचा संदर्भ घेऊन सूर्यनमस्कार साधकाने साधारणपणे वर्षभर सूर्यनमस्कार नियमितपणे घालावे. तसेच मार्गादर्शन व शंकासमाधानासाठी संस्थेच्या संपर्कात राहावे. म्हणजे त्यांना सूर्यनमस्कार समर्थसेवा स्वतंत्रपणे करता येईल. सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग आपल्या विभागात आयोजित करता येतील. समर्थसेवा आत्मविश्वासाने करता यईल याची खात्री आहे. - समर्थ सेवा नेहमीच विनामूल्य असते. कारण ती ‘अमूल्य’ असते. या साधनेतूनच ब्रह्मकर्म करण्याची प्रेरणा व ब्रह्मानंदाचा अनुभव मिळतो. साधनेतील श्रद्धा व त्यातून मिळणारी अनुभूती व्यक्ती सापेक्ष असते. म्हणून तिचे मूल्यही शुन्यापासून ब्रह्मांडाएवढे असू शकते. समर्थ कार्याला व्यापक लोकाधार भिक्षेचा असतो. ही भिक्षा आर्थिक किंवा वस्तू रूपाने देता येते. सूर्यनमस्कार/संस्कृत भाषा कार्यकर्ता होऊन आपल्या सेवेचे भिक्षादान सत्पात्री करता येते. किमानपक्षी दररोज अंघोळ झाल्यावर १५ ते २० मिनिटांचा वेळ स्वतःच्या आरोग्यासाठी, समर्थ देशसेवेसाठी देणे सहज शक्य आहे. अवश्य प्रयत्न करावा ही विनंती. पुस्तक सेवा देणगीमूल्य कमीत कमी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने या पुस्तकाची मागणी नोंदवावी ही विनंती. बलशाली भारत होण्यासाठी आपल्या आधाराची गरज आहे. सहकार्य आहेच ते अधिक वृद्धिंगत व्हावे ही अपेक्षा. सूर्यनमस्कार एक साधना आपल विश्वासू, श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक गुरुर्पार्णिमा १५ जुलै २०११ ३१०