पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

● - हळू हळू प्रयत्न करा. संपूर्ण आरोग्य सूर्यनमस्कार - प्राणायाम, आहार - औषध आणि साधनेतील श्रद्धापूर्ण सातत्य यामधून प्राप्त करून घेता येते. कोणत्याही प्रकारचे स्नायुंचे दुखणे सुरू न होता सूर्यनमस्कार साधना अखंडितपणे चालू रहाण्यासाठी प्रयत्न करणे हे आपले दररोजचे उद्दिष्ट आहे हे लक्षात ठेवा. समजून-उमजून, जाणीवपूर्वक सूर्यनमस्कार साधनेचे तप करा. जगातील प्रत्येक कुटुंब सूर्यनमस्कार साधनेचे केंद्र व्हावे, कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सूर्यनमस्कार साधनेचा प्रचार-प्रसार करणारा कार्यकर्ता व्हावा हे आपले उद्दिष्ट आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या सर्वांना सूर्यनमस्कार साधनेतून उदंड आरोग्य व आनंद प्राप्त व्हावा ही प्रभुरामचंद्राचे चरणी प्रार्थना. परिशिष्ट- ०५ ।।श्रीरामसमर्थ ।। श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक. (एफ- ११९३४ नासिक) ‘काशिवंत' पाटील लेन-४, कॉलेज रोड, नासिक ४२२००५ www.suryanamaskar.info E-mail infosuryanamaskar.info समर्थभक्त सूर्यनमस्कार साधकांना सादर प्रणाम! सूर्यनमस्काराची समर्थ सेवा चारी दिशेने प्रगतिपथावर आहे. उत्साह शतगुणीत होतो आहे. सूर्यनमस्कार संकेत स्थळ www.suryanamaskar.info यावर मिळणारा प्रतिसाद, त्यांना द्यावयाची उत्तरे, सूर्यनमस्कार व आरोग्य या विषयाचा पुणे विद्यापीठाचा बहि:शाल व्याख्याता, त्या निमित्ताने नासिक जिल्ह्यात प्रवास, दर आठवड्याला पाच दिवसांचे सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण सत्र आणि इतर उपक्रम सुरू असतात. हे सर्व करीत असतांना प्रत्येक व्यक्तीची सूर्यनमस्कार एक साधना ३०७