पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

● भ्रमणध्वनी, पत्र, ई-मेल, स्पाईक या माध्यमातून संस्थेच्या संपर्कात रहा. साधनेतील अडचण दूर करण्यासाठी मार्गदर्शन मिळेल. सूर्यनमस्कार घालण्यामध्ये शरीरातील ९५% स्नायू कार्यरत करायचे आहेत. हे सर्व स्नायू ज्या प्रमाणात व ज्या ताकदीने कामाला लागतात त्या प्रमाणात आपल्याला संपूर्ण आरोग्याची हमी मिळण्यास सुरूवात होते. • यासाठी अधीर होऊ नका. सूर्यनमस्कार घालण्यामध्ये शरीरातील ९५% पेक्षा अधिक स्नायू कार्यरत होण्यासाठी किती वेळ लागेल हे गणिताच्या भाषेत नक्की सांगता येणार नाही. हा कालावधी तुमचा स्वभाव, आहार, दिनचर्या, गट, वजन, उंची, बॉडीमास, व्यवसाय, शरीराची ठेवण, अयोग्य सवयी, व्याधी, अनुवंशिक विकार, आर्थिक स्थैर्य, सामाजिक/कौटुंबिक सुरक्षितता, साधनेतील तुमचे सातत्य व त्यावर असणारी अढळ श्रद्धा इत्यादी घटकांवर अवलंबून असतो. ● • अधिकाधिक स्नायू कार्यरत करण्यासाठी जोर-जबरदस्ती करू नका. त्यांच्या कलाने घ्या. तुमची इच्छा त्यांच्यावर लादू नका. तुमच्या मनाचे वय व शरीराचे वय यात फार गहन अंतर आहे. तुमच्या मन-बुद्धीचे सामर्थ्य व स्नायूंची शक्ती यांचा मेळ कसा बसेल? शरीराचा जन्म एवढ्यातच झालेला आहे. ते वयाने फारच लहान मूल आहे. ते बोलायला शिकते आहे असे समजा. त्याला शिकलेल्या भागाचा वापर करण्याची संधी वारंवार द्या. त्याच्याशी गप्पा मारा. त्याचे कौतुक करा. अन्यथा त्याची फक्त कर्णेद्रिये कार्यरत होतील इतर कर्मेंद्रिये मात्र त्याला साथ देणार नाहीत. • या साधनेच्या सुरूवातीला तुमची सूर्यनमस्कार घालण्याची क्षमता पंधरा मिनिटांमध्ये किमान तीन + १ अशी असते (संदर्भ घ्या-कार्यपुस्तिका, सूर्यनमस्कार ब्रह्मकर्मांतर्गत नित्यकर्म प्रथम दिवस सूचना). सूर्यनमस्कार कौशल्य जसे वाढते तसे याच वेळेत बारा+०१ सूर्यनमस्कार घालण्याची क्षमता निर्माण होते. सूर्यनमस्कारात ९५% स्नायू योग्य पद्धतीने सहभागी झाल्यानंतर याच पंधरा निनिटांमध्ये पन्नास+०१ सूर्यनमस्कार घालता येतात. (२४+२४+०१) संपूर्ण आरोग्य मन- शरीरामध्ये प्रस्थापित करण्यासाठी आपल्या क्षमते प्रमाणे सूर्यनमस्कार एक साधना ३०६