पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

देणार नाही. हळू हळू तो सूर्यनमस्कार साधक होईल. या नवीन साधकांसाठी घोष वाक्याचा बोध थोडा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. • घोषवाक्यात दिल्याप्रमाणे संपूर्ण आरोग्याची अनुभूती साधकाला पहिल्या दिवसापासून मिळेल हे गृहित धरणे अनाठाई आहे. • योग्य पद्धतीने सूर्यनमस्कार घालण्यास सुरूवात केल्यास साधनेच्या पहिल्या दिवसापासूनच संपूर्ण आरोग्य यासाठी यशस्वी वाटचाल सुरू झालेली आहे याचा अनुभव हमखास येईल. तो दिवसभर टिकेल हे नक्की. • ● सूर्यनमस्कार ही स्वयं साधना आहे. ती स्वतःनेच शिकायची असते. ती कोण शिकविते? कोणत्या पद्धतीने शिकविते? ती कशी शिकायची? यासाठी श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक. ही संस्था पाच दिवसांचे सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग प्रत्येक आठवड्यात अयोजित करत असते. आपल्या सोईने या वर्गास उपस्थित रहा. • सूर्यनमस्कार प्राणायाम प्रशिक्षण वर्ग पूर्ण केलेल्या साधकांसाठी, साधनेतील प्राथमिक कौशल्ये स्पष्ट करण्यासाठी सूर्यनमस्कार चित्रफित तयार केलेली आहे. दैनंदिन साधनेत सुरूवातीला तिचा वापर करा. • लेखकाने विकसित केलेले सूर्यनमस्काराचे संकेतस्थळ www.suryanamaskar.info याचा संदर्भ घ्या. सूर्यनमस्कार भिंतीतक्ता तयार केलेला आहे. त्यामध्ये शरीरातील ऊर्जाचक्र कोणते, त्यांचे शरीरावरील नेमके स्थान, त्यांचे महत्व, त्या त्या आसनातील ऊर्जाचक्र पकडायचे कसे, ते सूर्यनमस्कारात वापरायचे कसे याची माहिती दिलेली आहे. - सूर्यनमस्कार – एक साधना, कार्यपुस्तिका (साधकांसाठी) हे संस्थेने प्रसिद्ध केलेले पुस्तक वाचा. त्यातील विभाग दोन सूर्यनमस्कार कार्यपुस्तिका यामध्ये दिल्याप्रमाणे साधनेस सुरूवात करा. साधनेमध्ये काही अडचण, शंका आल्यास उत्तरार्ध या विभागात दिलेल्या शंका समाधान या प्रकरणाचा संदर्भ घ्या. शंका समाधान या प्रकरणामध्ये आपल्या समस्येचा उल्लेख नसल्यास दूरध्वनी, सूर्यनमस्कार एक साधना ३०५