पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट- ०४ ।। श्रीरामसमर्थ ।। श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक. (एफ-११९३४ नासिक) 'काशिवंत' पाटील लेन ४, कॉलेज रोड नासिक ४२२००५ www.suryanamaskar.info E-mail-infosuryanamaskar.info घोषवाक्य संपूर्ण आरोग्याची हमी फक्त पंधरा मिनिटांमध्ये. दररोज. हे घोष वाक्य सूर्यनमस्कार साधनेची जाहिरात नाही. ते प्रत्येक साधकाचे साधनेतील दररोजचे लक्ष्य आहे. प्रत्येक साधकाने हे घोषवाक्य डोळ्यासमोर ठेवावे. त्याची अनुभूती दररोजच्या साधनेमध्ये घ्यावी. आपले वागणे - बोलणे- दिसणे यातून ती प्रक्षेपित करावी. इतरांना सूर्यनमस्कार साधनेचे महात्म्य सांगावे. साधनेची दीक्षा द्यावी. समर्थसेवा करावी. राष्ट्र सेवा करावी. आपण स्वतः सूर्यनमस्कार साधनेचा प्रचार करावा, प्रसार करावा, सूर्यनमस्कार कार्यकर्ता व्हावे यासाठी हे बोधवाक्य आहे. साधकाला साधना सातत्याने ठेवण्यासाठी हे एक समर्थ संप्रेरक आहे. अर्थात सूर्यनमस्कार साधना ही फक्त साधकांची मक्तेदारी नाही. सूर्योपासना हा सर्व मानव जातींचा वारसा आहे. प्रत्येक व्यक्ती आज नाही उद्या सूर्यनमस्कार साधक बनून सूर्योपासना करणार आहे हे निश्चित. तो मुहूर्त या आदितवारी आहे कां पुढील मासिक /वार्षिक संक्रमण कालात आहे, कां पुढील साडेसातीमध्ये आहे हे अनिश्चित आहे. पण तो ज्या वेळी ही साधना स्वीकारेल त्यावेळी त्याला मदतीचा आधार लागणार आहे. तो देण्यासाठी सदैव तय्यार स्थितीत साधकांनी राहावे. बोधवाक्याची प्रचिती दैनंदिन साधनेत घेता येत असली तरच ती इतर साधकांमध्ये संक्रमित करता येईल. सूर्यनमस्कार साधकाच्या संपर्कामध्ये जो कोणी येईल त्याला सूर्यनमस्काराची लागण नक्की होईल. सूर्यनमस्कार बोधवाक्य जो कोणी वाचेल, ऐकेल त्याची साधनेबद्दलची उत्सुकता वाढेल. स्वतःच्या आरोग्याची चिंता त्याला स्वस्थ बसू सूर्यनमस्कार एक साधना ३०४