पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाराशे सूर्यनमस्कार घालण्याचे प्रात्यक्षिक सादर केले होते. आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस या प्रात्यक्षिकाला उपस्थित होते. • श्रीमंत भाऊसाहेब पेशवे दररोज बाराशे सूर्यनमस्कार घालीत होते असा एक दस्तऐवज इतिहास संशोधन मंडळ, पुणे येथे आहे. • श्रीमंत बाळासाहेब पंत, औंध (सातारा) यांनी स्वतः अठरा वर्षे सूर्यनमस्काराची साधना केली. त्यानंतर त्यांनी सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार आवश्यक केला. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर झालेला परिणाम बघून त्यांनी सूर्यनमस्कार विषयावर एक पुस्तिका (१९२६) लिहिलेली आहे. सूर्यनमस्कार फक्त सर्वांगिण व्यायामच नाही तर एक साधना आहे, जीवनाचे अमृत तत्त्व आहे याची आपण स्वतः अनुभूती घेतली. सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम करून तरुणांना बलोपासनेचा, शक्तीउपासनेचा संदेश दिला. सर्वांच्या अंतःकरणात असलेल्या सूर्यतेजाचा वह्नी पुन्हा चेतविला. आपले अभिनंदन. आपणाला त्रिवार अभिवादन. सूर्यनमस्काराचा अभ्यास, सराव किंवा विक्रम समर्थांचा उल्लेख केल्याशिवाय अपूर्ण आहे. त्यांना केलेला प्रणाम व अर्पण केलेला प्रसाद छत्रपती शिवाजी महाराजांना मिळतो. कारण या दोन्ही महामानवांचे एकच ध्येय आहे 'सर्वांना सर्व बंधनातून मुक्त करणे, रामराज्याची, स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे'. सूर्यनमस्काराचा संदेश वारंवार प्रसारित करण्याची प्रेरणा सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांनी आपणाला द्यावी, प्रभुरामचंद्रांनी ही मनोकामना पूर्ण करावी अशी सर्वभावे प्रार्थना करतो. पुनश्च अभिनंदन व अभिवादन. गुरूवार माघ शुक्ल सप्तमी (रथसप्तमी) शिवशके ३३७ (दिनांक : गुरूवार १० फेब्रुवारी २०११ ) मा. परमपूज्य श्री. भूषणस्वामी महाराज, श्री रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र, नासिक. (एफ- ११९३४ नासिक) 'काशिवंत' पाटील लेन ४, कॉलेज रोड नासिक ४२२००५ www.suryanamaskar.info E-mail-infosuryanamaskar.info सूर्यनमस्कार एक साधना समारंभाचे अध्यक्ष - ३०३