पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जागतिक सूर्यनमस्कार दिन १० फेब्रुवारी २०११ या निमित्ताने पाच दिवसांचा विनामूल्य सूर्यनमस्कार - प्राणायाम प्रशिक्षण यज्ञ सर्वांसाठी आयोजित केलेला आहे. या प्रशिक्षण यज्ञामध्ये सहभागी झालेले साधक, सर्व नासिककर तसेच जगातील सर्व समर्थभक्त व सूर्यनमस्कार साधक या विश्वविक्रमी करवीर पुत्राला, सूर्यदूताला मानाने अभिवादन करीत आहे. त्रिवार जयजयकार करून हार्दिक अभिनंदन करीत आहे. छत्रपती शाहुमहाराज यांचा बलोपासनेचा वारसा असलेल्या कोल्हापूरमध्ये हा पराक्रम आपण केला त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. आदिशक्ती अंबाबाईची उपासना म्हणजेच शक्तीउपासना. ही उपासना करणाऱ्या अनेक भूमिपुत्रांची या निमित्ताने प्रकर्षाने आठवण होते. • वेदकालीन सूर्यनमस्कार साधनेला उर्जितावस्था सद्गुरू समर्थ रामदास स्वामी यांनी आगर टाकळी (नासिक) येथे दिली. • 'श्री ग्रंथराज दासबोध' या ग्रंथाच्या प्रस्तावनेत श्रीधरस्वामी महाराज यांनी उल्लेख केलेला आहे की समर्थ रामदास स्वामी स्वतः बाराशे सूर्यनमस्कार घालीत व शिष्यांकडूनही घालून घेत असत. ● 'समर्थ रामदास स्वामींचे जनकपिता सूर्याजीपंत नित्य एक हजार सूर्यनमस्कार • मुख्य उद्देश आत्मतेज जागृत होणे.' हे वाक्य 3 श्रीहनुमानस्वामींची बखर यामधील आहे. घालीत.- --- . मसूलकर आश्रम (कराड, सातारा) सूर्यनमस्काराचा प्रचार प्रसार करण्यात अग्रेसर होता. या आश्रमामध्ये अठरा महिला दररोज बाराशे सूर्यनमस्कार घालत असत. ● धर्मभास्कर श्री. विनायक महाराज मसूलकर यांच्या भगिनी श्रीमती. द्वारकाबाई कुर्लेकर बाराशे सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक ठिकठिकाणी सादर करून सूर्यनमस्काराचा संदेश आम जनतेला देत असत. • १९३२ साली कराड येथील चावडी चौकात श्रीमती. द्वारकाबाई कुर्लेकर यानी 3 हनुमंत स्वामी हे समर्थांचे बंधू श्रेष्ट श्री गंगाधर स्वामी महाराजांचे सहावे वंशज. त्यांनी आपल्या बावीस पूर्वजांच्या कुळाची वंशावळ तयार केलेली आहे. सूर्यनमस्कार एक सा ३०२