पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

त्याला प्रिय असलेली तुळसही उष्ण. कफामुळे पोटात त्रास होत असेल तर हिरवी, उष्ण तुळस खा. गजाननाला आवडणाऱ्या एकवीस फुलांची यादी आहे- जास्वंदी, पांढरी कमळ, मधुमालती, जाई, सोनचाफा, केवडा, बकुळ, सुपारी, उंदी, नागकेसर, मोगरा, धोतरा, कन्हेरी, प्राजक्ता, चवई, नांदुरकी, गोविंद, मोहर, शतपत्र, तांबडे कमळ, नानाविध गजानन हा मूलाधार चक्राचा स्वामी आहे. मूलाधार चक्राचे अधिष्ठान पृथ्वीतत्त्व आहे. फुलांचा रंग - गंध त्यांचा शरीर अवयवांवर होणारा परिणाम याचे चिंतन केल्यास गजाननाचा आपल्या शरीर-बुद्धीवर असणारा प्रभाव लक्षात येईल. प्रत्येक कार्याचा || श्रीगणेशा || कसा वैद्यक व विज्ञानाने परिपूर्ण आहे हे समजेल. योग्य आहारातून औषधी अन्नरस सेवन करून विकारांवर विजय मिळविता येईल. परिशिष्ट- ०३ ।। श्रीरामसमर्थ ।। ।। मानाचा मुजरा ॥ ॥ सूर्यनमस्कार जागतिक विक्रम ।। माननीय राजमान्य राजश्री सूर्यदूत श्रीयुत युवराज बाबुराव माने mane.yuvaraj@gmail.com प्लॉट- ९४ ईश्वरकृपा, अंबाईनगर, मु.पो-हुपरी, ता- हातकणंगले, जिल्हा - कोल्हापूर - ४१६ २०३ पौष शुद्ध तृतिया शिवशके ३३६ (दिनांक १९ डिसेंबर २००९) रोजी आपण एका तासात आठशे सव्वीस जोर व त्यानंतर सहा तासात एक हजार दोनशे बारा सूर्यनमस्कार घातले. आपण केलेला हा विक्रम जागतिक महत्त्वाचा आहे. त्याचा समावेश लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेला आहे. रथसप्तमी, सूर्यनमस्कार एक साधना ३०१