पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रंगाचा कागद वापरता येईल. उन्हामुळे त्याचा रंग उडाल्यास दोन तीन दिवसांती तो बदलावा. सूचना विकाराच्या प्राथमिक अवस्थेमध्ये प्रायोगिक स्वरूपात हा उपचार करण्यास हरकत नाही. विकाराचे अपेक्षित शमन होते आहे असा अनुभव येत नसल्यास या बरोबर इतर पूरक उपचार सुरू करावेत. इतर औषधांनी विकाराचे पूर्णशमन झाले तरी हा उपचार काही दिवस सुरू ठेवण्यास हरकत नाही. - पूजाअर्चा करतांना कोणत्या देवतेला कोणती पाने- फुले वाहावी याची माहिती या संदर्भात उपयुक्त ठरेल. शंकराला बेल आणि विष्णूला तुळस का वाहातात? यामध्ये बदल केला तर चालेल का ? स्वतःला प्रश्न विचारा. उत्तर तुम्हाला निश्चित सापडेल. यात कर्मठपणा नाही वैद्यक शास्त्र आहे. त्याचा उलगडा आहारशास्त्रात सापडतो. शंकराचे / भोलेनाथचे स्थान कपाळावर. तिसरा डोळा. रंग पांढरा. पांढरा रंग शांत, सौम्य, सात्विक, सहनशील, सोशिक, समर्पित वृत्ती हे सद्गुण दाखवितो. आक्रमण करण्याचा गुणधर्म प्रभावी नसल्याने बरेच काही सोसावे लागते. डोक्यात संतापाचा उष्मा असतो. घश्यात विषाचा जाळ असतो. अंगाची लाही लाही होते. अशावेळी क्षोभ शांत करण्यासाठी, पित्तावर उतारा देण्यासाठी बेल किंवा बेलफळ वापरतात. कारण हे थंड आहे. शारीरिक उष्णता व मानसिक क्षोभ शांत करण्यासाठी याचा रामबाण उपयोग होतो. पित्तामुळे दाह होत असेल तर थंड गुणधर्म असलेले बेलपान किंवा बेलफळ खा. विष्णूचे स्थान मणिपूर चक्रावर. याला नाभीचक्र असेही म्हणतात. या चक्राचे अधिष्ठान अग्नी आहे. म्हणजे ओघाने रंग अग्नीनील असा आला. विष्णू हा विश्वाचा भरण-पोषण-संवर्धन करणारा ईश्वरांचाही ईश्वर आहे. तो क्षीरसागरात पहुडलेला आहे. क्षीर म्हणजे दूध. (आपला पिंड दूधावर, अन्नरसावर पोसला जातो.) दूध कफकारक आहे. भगवंताला सहस्त्रावधी व्यवधाने आहेत. सहस्रफणा असलेल्या नागाची छाया त्याच्या डोक्यावर आहे. नागही थंडच आहे. ब्रह्मांडनायकाची भूमिका करायची म्हणजे कफाची सुस्ती चालणार नाही. कफासाठी रामबाण उतारा आहे उष्ण पदार्थाचा, अग्नीचा म्हणून विष्णूचक्राचे अधिष्ठान अग्नी. सूर्यनमस्कार एक साधना ३००