पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खाली करून बाटलीतील साखर हलवा. संपूर्ण साखरेला सारख्या प्रमाणात सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे. ही प्रक्रिया किमान एक महिना सुरू ठेवा. ही साखर पाव चमचा एका वेळी घ्यावी. ही रंगउपचाराची एक मात्रा झाली. हा रंग औषधाचा एक डोस झाला. ज्या ऋतूत सूर्यप्रकाश कमी असतो. त्यावेळी याचा वापर करता येतो. तेलाचे अभ्यंग (मालिश) करून उपचार करणे गरजेचे असल्यास कोणत्या रंगाचा उपचार करायचा हे निश्चित करा. त्या रंगाची बाटली घ्या. या बाटलीत तेल भरा. ही तेल भरलेली रंगाची बाटली उन्हात ठेवा. रात्रीच्या वेळी ती आत आणणे आवश्यक नाही. आणल्यास ब्राह्म मुहूर्तावर पुन्हा बाहेर ठेवा. ही प्रक्रिया किमान एक महिना सुरू ठेवा. हे रंगऔषधी तेल तयार झाले. ज्या ऋतूत सूर्यप्रकाश कमी असतो. त्यावेळी याचा वापर करता येतो. कोणत्या रंगाचा उपचार करायचा हे निश्चित केल्यानंतर त्या रंगाच्या चारपाच बाटल्या घ्या. स्वच्छ धुऊन घ्या. या बाटल्यांमधे पिण्याचे पाणी भरा. यासाठी आदल्या दिवशी भरलेले पाणी वापरा. शिळ्या पाण्यामध्ये क्लोरीनचा परिणाम शिल्लक नसतो किंवा अतिअल्प असतो. बाटली थोडी रिकामी ठेवा. घट्ट बूच लावा. या बाटल्या सहा-सात तास उन्हात ठेवा. बाटलीच्या रिकाम्या भागात वाफ जमल्यावर हे पाणी रंग उपचार करण्यास योग्य झाले असे समजावे. हिरव्या रंगाच्या बाटलीतील एक पेलाभर पाणी एक डोस झाला. निळ्या रंगाच्या बाटलीतील एक पेलाभर पाणी एक डोस झाला. मात्र तांबड्या रंगाच्या बाटलीतील पाव पेला पाणी एक डोस झाला. हे पाणी बाटलीत तसेच ठेवल्यास तीन दिवस याचा वापर करता येतो. डोस दिवसातून किती वेळा घ्यायचा किंवा एकूण किती दिवस औषध चालू ठेवायचे हे विकाराचे स्वरूप लक्षात घेऊन तारतम्याने ठरवावे. कोणत्या अवयवावर कोणत्या रंगाचा उपचार करायचा हे निश्चित केल्यानंतर त्या प्रकाश रंगाचा उपयोग त्या त्या अवयवावर करता येतो. आरसा घ्या. प्रकाश किरणांचा परावर्तीत कवडसा त्या अवयवावर धरा. प्रकाश किरणांच्या झोतामध्ये रंगीत काच धरा. हा प्रकाशशेक दहा पंधरा मिनिटे एका वेळेस घ्या. आपल्याला आवश्यक असलेल्या रंगाची बाटली उपलब्ध नसल्यास त्या सूर्यनमस्कार एक साधना २९९