पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निळा. • तांबडा / लाल रंग उष्णता, अग्नी यांचा निर्देश करतो. हा रंग उत्साह, आनंद, शक्ती प्रदान करणारा आहे. ● हिरवा रंग हा तांबडा व निळा रंग यांचे संतुलन आहे. यामुळे शारीरिक आरोग्य सातत्याने टिकून राहते. • निळारंग हा थंडावा निर्माण करणारा आहे. शरीरातील रुक्षपणा यामुळे कमी होतो. शरीरातील प्रत्येक अवयव आणि हे तीन रंग यांचे सततचे साधर्म्य आहे. एखाद्या अवयवाच्या विकारावर त्याची रंगाची कमतरता दूर करून व्याधी दूर करता येते. उदाहरणार्थ- तांबडा / लाल रंग जननेंद्रियांशी निगडित आहे. हिरवा रंग हा आतडी, मूत्रपिंड, कातडी या अवयवांशी निगडित आहे. निळा रंग हा डोके, मान, गळा या अवयवांशी निगडित आहे. पिवळा रंग हा हृदय, यकृत या अवयवांशी निगडित आहे. . जांभळारंग छाती व फुप्फुसे या अवयवांशी निगडित आहे. उपचार पद्धती- विकाराचे शरीरातील स्थान व अवयव निश्चित केल्यानंतर त्या संबंधित रंगाचा उपचार सुरू करता येईल. त्यातील पहिला प्रकार - भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या, फळे इत्यादी त्या त्या रंगाच्या आहारामध्ये जास्त प्रमाणात घ्याव्यात. त्या अन्न घटकाचा बाह्य रंग विचारात घ्यावा. उदाहरणार्थ कैरी हिरवी. आंबा पिवळा. सफरचंद तांबडे, केळ कच्चे हिरवे, पिकलेले पिवळे. कोणत्या रंगाचा उपचार करायचा हे निश्चित केल्यानंतर त्या रंगाची बाटली घ्या. या बाटलीत साखर भरा. साखर फक्त पाऊण बाटलीच भरा. ही साखर भरलेली रंगाची बाटली उन्हात ठेवा, रात्रीच्या वेळी ती आत आणणे आवश्यक नाही. आणल्यास ब्राह्म मुहूर्तावर पुन्हा बाहेर ठेवा. दररोज एकदा बाटली वर- सूर्यनमस्कार एक साधना २९८