पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहेत. हे सर्व प्रकार एका महा वटवृक्षाच्या पारंब्या आहेत. कारण प्रत्येक प्रकारात वापरलेली सर्व औषधे निसर्गोत्पन्न आहेत. सूर्य आत्माजगततस्थुषश्च ।। आहे. सूर्यनारायणाला रसाधिपती ही उपाधी आहे. अन्न-रसाची व औषधी- रसाची निर्मिती ही त्याचीच किमया आहे. हा रस उपचार पद्धती व आरोग्य यामधील गाभा आहे. सूर्यनारायण हा निसर्गोपचाराचा प्रथम अविष्कार आहे. विश्वाचा वैद्य आहे. विश्वाहभेषजी आहे. म्हणूनच आपल्या आरोग्याचे रक्षण करण्याची प्रार्थना सूर्यनारायणाला साष्टांगनमस्कार (सूर्यनमस्कार) घालून दररोज करायची असते. आयुर्वेद शास्त्रातील औषधे वेद कालापासून वापरात आहेत. त्यातील प्रत्येक औषधी घटकांचा परिणाम स्वयंसिद्ध आहे. कालौघात त्याच्यात बदल झालेला नाही. पुढेही कधी होणार नाही. कारण सुंठ या औषधाचा परिणाम उष्ण आहे. सुंठ कायम उष्णच राहणार. गुलकंद कायम थंडच असणार आहे. हेच नाते लवंग व वेलदोडा यांचेमध्ये आहे. आरोग्यशास्त्राचे प्रकार अनेक आहेत - आयुर्वेद शास्त्र, एलोपथी शास्त्र, होमिओपथी शास्त्र, बाराक्षार चिकित्सा, चुंबक चिकित्सा, नादचिकित्सा, निसर्गोपचार चिकित्सा, मंत्रचिकित्सा, आहार चिकित्सा, दाबबिंदू चिकित्सा, अग्नीडाग चिकित्सा, विद्युत किरण चिकित्सा, जल चिकित्सा, मर्दन (मॉलिश) चिकित्सा, योगशास्त्र चिकित्सा, सूर्यकिरण चिकित्सा इत्यादी. प्रत्येक चिकित्सा शास्त्र आरोग्य वर्धन, रोग प्रतिबंध व रोगोपचार या तीनही बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करते. सूर्यकिरण चिकित्सा (Chromo Therapy) याला रंगचिकित्सा असेही म्हणतात. प्राथमिक स्वरूपातील विकारावर उपचार करण्यासाठी बिनधोकपणे हे उपचार वापरता येतात. विकार बळावलेला असल्यास इतर उपचार चालू करावेत. इतर उपचार घेत असतांनासुद्धा सूर्यकिरण चिकित्सा सुरू ठेवता येते. विकारातून मुक्तता झाल्यानंतरही या विकाराची वारंवारिता असेल तरी हे उपचार चालू ठेवता येतात. याचा उपयोग रोग प्रतिबंध-उपचार - आरोग्य असा तिहेरी पद्धतीने करता येतो. सूर्यकिरण चिकित्सेमध्ये सूर्यकिरण व विशिष्ट रंग यांची सांगड घातलेली आहे. यामध्ये तीन रंगांचा वापर करण्यात येतो. ते आहेत- तांबडा, हिरवा, सूर्यनमस्कार एक साधना २९७