पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मठामध्ये मला पाच दिवस सूर्यनमस्कार साधना करता आली. आदिमातेच्या शक्ती पीठाचे स्थानमहात्म्य प्रत्यक्ष अनुभवले. नंतर मठाच्या 'सद् विद्या संजीवनी संस्कृत महापाठ शाळेत' सूर्यनमस्कार प्रशिक्षण वर्ग घेण्याची संधी मिळाली. दहा दिवस मठामध्ये मुक्काम करण्याचे भाग्य मिळाले. मठात व शृंगेरी गावामध्ये संपर्क करता आला. परिचय वाढला. या संपर्कामध्ये वयोवृद्ध अनुभवी ज्योतिषी यांचा मुद्दाम उल्लेख करावयास हवा. आदि शंकराचार्यांकडून मिळालेला सूर्यनमस्काराचा वारसा (संदर्भ घ्या पूर्वार्ध, सूर्यपंचायतन) आजही या परिसरात वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने ज्योतिषी पाळतात. कोणता ग्रह निचेचा आहे हे लक्षात घेऊन कायिक सूर्योपासना करण्याचा सल्ला प्रथम देतात. सूर्यनारायणाची विधीवत पूजा करून दररोज सूर्यनमस्कार घालण्याचा प्रभावी उपाय सूचवितात. त्यानंतर जप, पूजा, पाठ इत्यादी मानसिक विधी सांगितले जातात. लहान मूल, वृद्ध किंवा रुग्ण असल्यास पुरोहितांना दक्षिणा देऊन त्यांचेकडून सूर्यनमस्कार संकल्पपूर्ती करावी हा पर्यायी उपाय असतो. हा सूर्यनमस्कार विशेष शृंगेरी परिसर, कर्नाटक राज्य तसेच आसपासच्या प्रदेशामध्येही प्रचलित आहे. समर्थस्तोत्र (शार्दूलविक्रीडित) राष्ट्रा ऊर्जितकाल हा जीर हवा सांगे हिता चांगले। लावा की जनि लक्ष या प्रभुपदी वागा जसे बोधिले । राष्ट्रा सदगुरू हेचि मानुनि पदी लीनत्वि गर्जु भले । विश्वोध्दारी विभु समर्थ जगती त्यांची नमी पाउले।।१६।। परिशिष्ट- ०२ सूर्यकिरण चिकित्सा - - श्रीधरस्वामी महाराज आरोग्यशास्त्र आपल्या आरोग्याची काळजी घेते. रोग व्याधी विकार होऊ नयेत म्हणून मार्गदर्शन करते. प्रतिबंधक उपाय सुचविते. काही आजार झाल्यास त्यावर योग्य औषध-उपचार करून तो बरा करते. आरोग्यशास्त्र अनेक प्रकारचे सूर्यनमस्कार एक साधना २९६