पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आज आपण 1 पराभूत वृत्ती व परधार्जिणे धोरण या दोन पायावर उभे आहोत. 2 सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत स्वत्व-स्वाभिमान-स्वराज्य यांच्या दिवाळखोरीची लक्षणे आपण अनुभवतो. याला एकही क्षेत्र अपवाद नाही. व्यायाम, भोजन, शिक्षण, करमणूक, औषधे या सर्वांचे सुकाणू विनाशाच्या हातात आहे. आपणाला तिसराच कोणी कडेलोट करण्यासाठी फरफटत नेत आहे. आपण मात्र संवेदना शून्य होतो आहे. गर्भगळीत झालेलो आहे. ही परिस्थिती बदलायची झाल्यास समर्थांनी दिलेला शक्तीउपासनेचा वारसा जागवला पाहिजे. सूर्यनमस्कार सर्वांगसुंदर व्यायाम तर आहेच पण त्या बरोबर तेजाची, अग्नीची उपासना आहे. आत्मारामाची उपासना आहे. प्रत्येक साधकाचे आत्मतेज जागृत करणारी, उन्नत करणारी ती एक अलौकिक साधना आहे. आपला देश जगामध्ये महासत्ता व्हावी हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न आहे. त्यासाठी तरुणांची सर्वाधिक टक्केवारी उपयोगाची नाही. त्या टक्केवारीमध्ये आत्मतेजाचे चैतन्य निर्माण झाले पाहिजे. त्यासाठी सूर्यनमस्कार साधनेला दुसरा पर्याय नाही. आजारपणात वैद्य तर संकट काळामध्ये ज्योतिषी किंवा पुरोहित प्रतिपरमेश्वर असतात. संकट मुक्त होण्यासाठी दैवी आधार शोधण्यास सुरूवात होते. ज्योतिषी/ पुरोहित यांचे मार्गदर्शन घेतले जाते. परमेश्वराची आराधना सुरू होते. सूर्योपासना, शक्तीउपासना, कुलदेवतेची उपासना सुरू होते. साडेसातीमध्ये शनिची/मारुतीची उपासना करण्यास सांगितले जाते. त्यासाठी स्तोत्रपठण, जपजाप्य, पूजापाठ, धार्मिक विधी, उपवास इत्यादी मानसिक उपासना सुचविल्या जातात. मानसिक उपासनेचे सामर्थ्य गहन आहे. मन-बुद्धी साधनेमध्ये एकरुप झाल्यावर सर्व 1 इ. स. पूर्व ३५६-३२३ अलेक्झांडर पासून हिंदुस्थानात परकीय आक्रमणे सुरू आहेत. मुख्यत्वेकरून चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, विजयनगरचे साम्राज्य व शिवशाही या कालावधीतच फक्त हिंदुच्या पराक्रमाने परकियांना पिटाळून लावले/ त्यांची आक्रमणे थोपविली. 2 जन्म-मृत्यू आयुष्याची दोन टोके. जन्माची सुरुवात गर्भसंस्कारातून मृत्यूची गंगोदकाने..... औषधं जान्हवी तोयं वैद्यो नारायणो हरि।।) ही आपली संस्कृती. आज औषधांमध्ये जन्म व ऑक्सिजनमध्ये मृत्यू हे आयुष्याचे समीकरण झाले आहे. सूर्यनमस्कार एक साधना २९४