पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्य कन्या राशीमध्ये असल्यास नेहमीचे राशीफळ प्रकर्षाने मिळतेच. त्याचबरोबर खाली दिलेले इतर लाभही होतात. सर्व प्रकारचे कला क्षेत्र यांना फलदायी आहेत. या व्यक्ती कलासक्त, तीव्रस्मरणशक्ती असलेल्या, शिस्तप्रिय सदा हसतमुख असतात. कला, क्रीडा, व बौद्धिक काम यात यशस्वी होतात. सूर्य तुला राशीमध्ये असल्यास नेहमीचे राशीफळ प्रकर्षाने मिळतेच. त्याच बरोबर खाली दिलेले इतर लाभही होतात. सामुहिक कार्य किंवा भागीदारी व्यवसाय फलदायी असतो. या व्यक्ती परदेश गमनाची आवड, परोपकारी, शत्रुपीडानसलेल्या अशा असतात. शांत स्वभाव, तडजोड करण्याची वृत्ती, ईश्वरभक्त, बुद्धीवादी हा यांचा स्थायीभाव असतो. सूर्य वृश्चिक राशीमध्ये असल्यास नेहमीचे राशीफळ प्रकर्षाने मिळतेच. त्याचबरोबर खाली दिलेले इतर लाभही होतात. मादक द्रव्य, औषधे याप्रकारचा व्यवसाय फलदायी असतो. ही व्यक्ती कठोर परिश्रम करणारी, स्पष्टवक्ती, उग्रस्वभावी, अतिआग्रही, सर्वकला व गूढविद्या याबद्दल आकर्षण असणारी असते. यांना समाजात मानाचे स्थान प्राप्त होते. सूर्य धनू राशीमध्ये असल्यास नेहमीचे राशीफळ प्रकर्षाने मिळतेच. त्याच बरोबर खाली दिलेले इतर लाभही होतात. सरकारी नोकरीत तत्वज्ञ, विचारवंत म्हणून मानाचे स्थान मिळते. ही व्यक्ती लढाऊ वृत्तीची, साहसी, परमेश्वरावर दृढ श्रद्धाभाव असणारी असते. धर्म, कायदा, गूढविद्या यामध्ये आवड असणा- या, आत्यंतिक प्रयत्नवादी असतात. हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यामध्ये यश मिळवितातच. सूर्य मकर राशीमध्ये असल्यास नेहमीचे राशीफळ प्रकर्षाने मिळतेच. त्याच बरोबर खाली दिलेले इतर लाभही होतात. राजकीय कारकीर्द फलदायी असते. ही व्यक्ती चिडखोर, चंचल, सेवाभावी, भांडखोर शिष्ट गूढ व अध्यात्मिक स्वभावाची असते. सूर्य कुंभ राशीमध्ये असल्यास नेहमीचे राशीफळ प्रकर्षाने मिळतेच. त्याचबरोबर खाली दिलेले इतर लाभही होतात. विद्याव्यासंग व विद्याव्यापार हे फलदायी असतात. ही व्यक्ती बुद्धीवान, भावनाप्रधान, मनमिळाऊ, उदार, सूर्यनमस्कार एक साधना २९२