पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आहे हे सर्वात महत्वाचे. सूर्याच्या सान्निध्यात सर्वच राशींचे कारकत्व उजळून निघते, प्रभावी होते. राशी फळ निश्चित करण्यासाठी तिथी, वार, ग्रह, नक्षत्रे, रास या प्रत्येकाचे विशेष कारकत्त्व विचारात घ्यावयाचे असतात. राशी आणि सूर्य यांचे मिलन त्यामधील सर्वात महत्त्वाचे आहे. आपला पिता, आपले सर्वस्व स्वस्थानात आल्यावर कोणाला आनंद होणार नाही ? या आनंदी वृत्तीचा प्रभाव व परिणाम सर्व संबंधितांवर होणारच. सूर्य मेष राशीमध्ये असल्यास नेहमीचे राशीफळ प्रकर्षाने मिळतेच. त्याच बरोबर खाली दिलेले इतर लाभही होतात. जमीन किंवा शेती उत्पादनात लाभहोतो. ही व्यक्ती शूर, बलवान, पर्यटनामध्ये आवड, राजेशाही थाट, अधिकार व प्रसिद्धी प्राप्त असलेली अशी असते. सूर्य वृषभ राशीमध्ये असल्यास नेहमीचे राशीफळ प्रकर्षाने मिळतेच. त्याचबरोबर खाली दिलेले इतर लाभही होतात. वस्त्र, सुगंधी वस्तू, इतर कला यातून चांगला लाभ मिळतो. संगीत व वाद्याची आवड, सर्वांना बरोबर घेऊन स्वतःची प्रगती करतात, भावनाप्रधान असतात. सूर्य मिथुन राशीमध्ये असल्यास नेहमीचे राशीफळ प्रकर्षाने मिळतेच. त्याच बरोबर खाली दिलेले इतर लाभही होतात. बौद्धिक राशी असल्याने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात. लेखक, कवीं, शल्यविशारद, वैज्ञानिक संशोधक, कायदेपंडित इत्यादी क्षेत्रात यशस्वी होतात. सूर्य कर्क राशीमध्ये असल्यास नेहमीचे राशीफळ प्रकर्षाने मिळतेच. त्याच बरोबर खाली दिलेले इतर लाभही होतात. जल संपत्ती किंवा जलासंबंधित व्यवसायात लाभ होतो. पर्यटनाची आवड, निष्काळजी चैनी वृत्ती, राजवैभव भोगणारे राजे रजवाडे किंवा मंत्री, मुख्यमंत्री, अधिकारी याची योग्यता मिळविणारे असतात. कर्तव्यदक्ष, परोपकारी, चंचल वृत्ती, तापट स्वभाव, प्रसिद्ध व्यक्तिमतत्त्व असते. सूर्य सिंह राशीमध्ये असल्यास नेहमीचे राशीफळ प्रकर्षाने मिळतेच. त्याच बरोबर खाली दिलेले इतर लाभही होतात. वन, किंवा वनसंपत्ती फलदायी असते. या व्यक्ती उदार, उग्र स्वभावाच्या, उद्योगशील, स्वाभिमानी, परोपकारी असतात. पराक्रम व आत्मविश्वास यांच्या प्रत्येक कृतीमध्ये दिसतो. सूर्यनमस्कार एक साधना २९१