पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राशी तयार होते. गुद व लिंग ( बस्ती) या भागावर राशीचा प्रभाव असतो. वायुतत्त्व, त्रिधातू प्रकृती, रजोगुणी रास आहे. वृश्चिकरास - विशाखाचे एक चरण व अनुराधा, ज्येष्ठा नक्षत्रे मिळून ही राशी तयार होते. पाठीचा कणा, गुह्येद्रिय या भागावर राशीचा प्रभाव असतो. जलतत्त्व, कफ व पित्तप्रकृती, तमोगुणी रास आहे. धनूरास – मूळ, पूर्वाषाढा व उत्तराषाढा चे एक चरण मिळून ही राशी तयार होते. जांघा, मांडया व पृष्ठभाग या भागावर राशीचा प्रभाव असतो. अग्नीतत्त्व, वातप्रकृती, सत्वगुणी रास आहे. मकररास- उत्तराषाढा चे तीन चरण व श्रवण, धनिष्ठाचे दोन चरण मिळून ही राशी तयार होते. गुडघ्यावर या राशीचा प्रभाव असतो. जलतत्त्व, वातप्रकृती, सत्वगुणी रास आहे. कुंभरास - धनिष्ठाचे दोन व शततारका, पूर्वाभाद्रपदा चे तीन चरण मिळून ही राशी तयार होते. पायांच्या पोटऱ्या भागावर राशीचा प्रभाव असतो. वायुतत्त्व, कफप्रकृती, तमोगुणी रास आहे. मीनरास- पूर्वाभाद्रपदाचे शेवटचे व उत्तराभाद्रपदा, रेवतीमिळून ही राशी तयार होते. दोन्ही पाऊले व त्यांची बोटे व त्यांची तळवे या भागावर राशीचा प्रभाव असतो. जलतत्त्व, कफप्रकृती, सत्वगुणी रास आहे. द्वादशभाव कुंडली व राशी फळ- आपल्या जन्माचे वेळी आकाशात जी राशी, ग्रह यांची स्थिती असते ती जन्मलग्न कुंडली. जन्म लग्न म्हणजे जन्माचे वेळी पूर्वक्षितीजावर उदित असणारा राशी विभाग होय. क्रांतीवृत्ताचे समान बारा भाग करून ते कागदावर दाखविलेले असतात. यालाच राशी विभाग किंवा राशीभाव म्हणतात. एखाद्याची द्वादशभाव कुंडली म्हणजे त्याच्या जन्माचे वेळी आकाशातील ग्रह- राशींची स्थिती दर्शवणारा तक्ता होय. हे बारा भाव स्थिर आहेत. त्यांचे क्रमांक, त्यांना दिलेली नावे, व त्यांचे स्थान महात्म्य हेही निश्चित आहेत. ग्रह, रास, नक्षत्रे, कुंडलीतील कोणत्या स्थानावर आहेत हे महत्वाचे. कोणत्या भावात कोणत्या राशींशी सूर्याची युती सूर्यनमस्कार एक साधना २९०