पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

राशी विशेष प्रत्येक राशीचे स्वतःचे असे वर्तन गुणविशेष असते. त्यावरून त्या राशीचे स्वभाव वैशिष्ट्ये लक्षात येतात. फलप्रदान करण्याचे गुणावरून त्या राशीचा एकूण प्रभाव कळतो. क्रांतीवृत्ताचे समान बारा भाग केल्यास प्रत्येक राशीला तीस अंशाचा प्रदेश मिळतो. याला राशि - स्थान म्हणतात. राशीच्या स्थानावरूनच राशीचे तत्त्व - गुण - स्वभाव कळतात. मेषरास अश्विनी, भरणी व कृत्तीकेचं एक चरण अशी नक्षत्रे मिळून ही राशी तयार होते. मेंदू व मस्तक या भागावर राशीचा प्रभाव असतो. अग्नी तत्त्व, पित्तप्रकृती, रजोगुणी अशी ही रास आहे. - - वृषभरास - कृत्तीकेचे तीन चरण रोहिणी, मृग अर्ध्य ही नक्षत्रे मिळून ही राशी तयार होते. मुख व डोळे या भागावर राशीचा प्रभाव असतो. पृथ्वीतत्त्व, वातप्रकृती, रजोगुणी रास आहे. मिथुनरास – मृग अर्ध्ये, आर्द्रा, पुनर्वसूची तीन चरणे ही - मिळू तयार होते. खांदे व गळा या भागावर राशीचा प्रभाव असतो. पृथ्वीतत्त्व, वातप्रकृती, रजोगुणी रास आहे. - कर्करास – पुनर्वसूचे चवथे चरण, पुष्य, आश्लेषा ही नक्षत्रे मिळून ही राशी तयार होते. छाती व हृदय या भागावर राशीचा प्रभाव असतो. जलतत्त्व, कफप्रकृती, रजोगुणी रास आहे. सिंहरास मघा, पूर्वा व उत्तराचे एक चरण नक्षत्रे मिळून ही राशी तयार होते. उदर, पाठ व हृदय या भागावर राशीचा प्रभाव असतो. अग्नीतत्त्व, पित्त्प्रकृती, तमोगुणी रास आहे. - कन्यारास उत्तरा तीन चरण, हस्त व चित्राची दोन चरण नक्षत्रे मिळून ही राशी तयार होते. कंबर, पोट व आतडी या भागावर राशीचा प्रभाव असतो. पृथ्वीतत्त्व, वातप्रकृती, सत्वगुणी रास आहे. तुळरास - चित्राची दोन चरण व स्वाती, विशाखाचे तीन चरण नक्षत्रे मिळून ही - सूर्यनमस्कार एक साधना २८९