पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गुरू हा जगतगुरू आहे. मुख्यत्वे करून न्यायदानाचे कारकत्व याचेकडे आहे. याला गुरू म्हणजेच बृहत / मोठा ही विशेषणे आहेत. गुरू या ग्रहाला पाच चंद्र आहेत. सर्वग्रहांमध्ये शुभग्रह आहे. गुरूला राशिचक्राची पूर्ण प्रदक्षिणा घालण्यासाठी बारा महिने लागतात. कर्क, वृश्चिक, मकर, मीन, तुळ या राशींशी त्याचे सख्य आहे. धनु व मीन या दोन राशींचा गुरू अधिपती आहे. शुक्र- गुरू हा देवांचा गुरू आहे. शुक्र हा दानवांचा गुरू आहे. विवाह वैवाहिक सुख यांचा प्रमुख कारक आहे. चंद्राला राजमाता म्हणता येईल तर शुक्राला राणी म्हणून संबोधता येईल. हा ग्रह वृषभ व तूळ या दोन राशींचा स्वामी आहे. शनी - शनी शनैश्चर म्हणजे मंदगती असणारा. साडेएकोणतीस वर्षांमध्ये बारा राशिंतून त्याचे एक भ्रमण पूर्ण होते. एका राशीमध्ये अडीचवर्षे राहतो. ज्या राशीमध्ये शनी आहे त्याच्या मागच्या व पुढच्या राशीवर याचा प्रभाव असतो. याच्या प्रभावाखालील काळ साडेसात वर्षांचा असतो. हा राजाच्या सेवकाची भूमिका करणारा ग्रह आहे. धन-संपत्ती- सौख्य यांचा कारक आहे. नवग्रहात शनी अखेरचा ग्रह आहे. याला आठ चंद्र आहेत. म्हणून याला प्रतिसूर्य मानतात. त्याला सूर्यपुत्र/सौरी असे संबोधन वापरतात. हा ग्रह मकर व कुंभ राशींचा स्वामी आहे. मिथुन, तुळ, कुंभ या राशींशी त्याचे सख्य आहे. राहू - केतू हे इतर ग्रहाप्रमाणे स्वतःचे वस्तुमान असलेले ग्रह नाहीत. पृथ्वीच्या भ्रमण मार्गातील उत्तरेकडचा छेदन बिंदू राहू व दक्षिणेकडचा छेदन बिंदू केतू असे संबोधतात. राहूचे वागणे किंवा फळ शनिप्रमाणे मिळते. केतू हा ग्रह तंत्र मंत्र साधना, तपश्चर्या याचा निर्देश करतो. त्याचे फळ मंगळाप्रमाणे करतात. हे दोन्ही ग्रह राशिचक्रात उलट गतीने फिरतात. ते नेहमीच वक्री असतात. साडेएकोणावीस वर्षामध्ये त्यांची बारा राशित एक प्रदक्षिणा पूर्ण होते. राहू कन्येचा स्वामी आहे. केतु मीनेचा स्वामी आहे. हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांचा शोध अलीकडे लागलेला आहे. फलज्योतिष शास्त्राची निर्मिती प्राचिन कालापासून आहे. हर्षल या ग्रहाला बारा राशींचे भ्रमण करण्यास चौऱ्याऐंशी वर्षे लागतात. नेपच्यूनला एकशे पासष्ट वर्षे लागतात. प्लुटोला तीनशे वर्षे लागतात. याच कारणाने फलज्योतिष शास्त्रात या ग्रहांचा फारसा विचार केलेला नाही. सूर्यनमस्कार एक साधना २८८