पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

झाल्यास निसर्गन्यायाने शिक्षा ही मिळणारच. कारक अतीसूक्ष्म-लहान-मोठे-विराट कसेही असले तरी त्याचा परिणाम संपर्कामधील सर्व चलअचल वस्तूंवर होत असतो. मे महिन्यात भर दुपारी उन्हात उभे रहा. सूर्यनारायणाच्या कारकत्वाचा प्रभाव अनुभवण्यास मिळेल. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्यावर समुद्राला भरती येते. आपल्याही शरीरात तीन पंचमांश पाणी आहे. चंद्राचा प्रभाव आपल्या मनावर होतो. अमावस्या पौर्णिमेला मनोरुग्णांचे मानसिक संतुलन बिघडते. त्या दिवशी दत्तमंदिरात घुमणारे किंवा मनोरूग्णालयात रुग्ण जास्त संख्येने आढळतात. सूर्योदयाचे कारकत्व निश्चितपणे सूर्यनारायणाच्या पलीकडे असणार. (श्लोक व अर्थ संदर्भ- पूर्वार्ध भाग एक बघा) हे कारकत्व आपल्याला विदित नाही कारण ते दृष्य स्वरूपात नाही. पण सूर्योदय पूर्व दिशेला होतो हे आपण दररोज अनुभवतो. सूर्य नियमितपणे एकाच बिंदूतून उदयाला येत नाही. सहा महिने तो उत्तरेकडे व पुढील सहा महिने दक्षिणेकडे सरकतांना दिसतो. यालाच उत्तरायण व दक्षिणायन म्हणतात. मकरसंक्रातीपासून सहा महिने उत्तरायणाचा काल असतो. कर्कराशीत सूर्याने प्रवेश केल्यावर पुढे सहा महिने दक्षिणायनाचा काल असतो. नभोमंडलातून सूर्य दीर्घ वर्तुळाकार मार्गाने परिभ्रमण करतो. (असे आपल्याला भासते. प्रत्यक्षात पृथ्वीच्या भ्रमण गतीचा हा भासानुभव आहे.) या त्याच्या परिभ्रमण मार्गाला क्रांतिवृत्त म्हणतात. हे क्रांतीवृत्त साधारणपणे ३६५ दिवसांचे आहे. या लंबाकृती क्रांतीवृत्ताचे समान भाग पाडून कालगणना केली जाते. पळे, घटिका, दिवस-रात्र, तिथी, वार, करण, नक्षत्र, राशीकाळ, आठवडा, पक्ष / पधरवडा, मास, ऋतू इत्यादी परिमाणांनी काळ / वेळ सांगता येतो. मोजता येतो. आठवड्याचे वार / दिवस सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंतचा काळ हा एक दिवस किंवा एक वार / तिथी असतो. आठवड्याचे एकूण वार सात असतात. सर्व जगामध्ये वारांची नावे व त्याचा क्रम सारखाच आहे. तो भारतीय पंचांगाप्रमाणे आहे. ही नावे सूर्य व इतर ग्रह यावरुन देण्यात आलेली आहेत. रविवार / आदितवार (रवि, सूर्य, आदित्य यावरून) सूर्यनमस्कार एक साधना २८४