पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

परिशिष्ट- ०१ सूर्यनारायण आणि ज्योतिषशास्त्र गतीमुळे आकर्षण व उष्णता निर्माण होते. हा भौतिक शास्त्राचा सिद्धांत आहे. आकाशामध्ये निरंतर चाललेल्या गतीमुळे एखाद्या तेजोमय मेघाची घनता वाढते. ते तेज घनीभूत होते. या तेजोमेघाच्या मध्यवर्ती सूर्य असतो. त्याच्या आकर्षण प्रभावामुळे इतर ग्रह तयार होतात. हे ग्रह त्यांच्या कक्षेत सूर्याभोवती फिरतात. हे सर्व ग्रह-उपग्रह मिळून एक सूर्यमाला तयार होते. विश्वात असंख्य सूर्यमाला आहेत. या प्रत्येक सूर्यमालेत ग्रह, तारे, धुमकेतू, उल्का असतात. आपल्या सूर्यमालेत सूर्य प्रमुख स्थानी असून इतर ग्रह बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरू, शनी, हर्षल, नेपच्यून, प्लुटो, राहू केतू असे आहेत. सूर्यापासूनच या सर्व बारा ग्रहांची उत्पत्ती झालेली आहे. सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च।। (ऋग्वेद) तो सर्वग्रहांचा आत्मा आहे. त्यांचा पिता आहे. सूर्यमालेतील कुटुंबाचा जनक आहे. त्याला द्वादशात्मा असे एक विशेषण आहे. हा कुटुंब प्रमुख असल्याने तो पितृकारक आहे. विश्वाचा सर्वेसर्वा आहे. सामर्थ्य व शक्तीचा स्त्रोत आहे. या संपूर्ण विश्वामध्ये असलेल्या प्रत्येक जीव-वस्तूला काहीतरी कारकत्त्व आहे. कारकत्व म्हणजे निर्मितीचे कारण, ते निर्माण करणारा आणि त्याची कृती (कार्य) या तिन्ही गोष्टी कारकत्व या शब्दामध्ये अंतर्भूत आहेत. कोणीतरी या प्रत्येक जीव-वस्तूच्या अस्तित्वाला कारणीभूत आहे. तसेच त्या प्रत्येकाच्या असण्याचे काहीतरी निश्चित कारण आहे. ते कारण प्रत्यक्ष कृतीतून सार्थकी लावणे ही प्रत्येकाची जबाबदारी असते. प्रत्येकाच्या कारकाचा परिणाम इतरांवर होत असतो. प्रत्येकाचे कार्य हाच खरा विश्वाचा आधार आहे. ब्रह्मकर्म आहे. ब्रह्मांडामध्ये तीन प्रकारचे कार्य सातत्याने चाललेले असते. उत्पत्ती-स्थिती - लय. याचे कारकत्व ब्रह्मा-विष्णु- महेश यांच्याकडे आहे. आपला व इतरांचा जन्म- -जीवन- न-मृत्यू सुखाचा करण्यासाठी ब्रह्मदेवाला सहाय्यभूत होणारे कार्य म्हणजे ब्रह्म कर्म होय. हे ब्रह्मकर्म नित्यनेमाने करणे हाच प्रत्येकाचा धर्म आहे. हाच निसर्ग नियम आहे. याच्या विपरित वागणे सूर्यनमस्कार एक साधना २८३