पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• समर्थ रामदास स्वामींनी या ठिकाणी शक्तीउपासनेला सुरूवात केली. गायत्री पुरश्चरण केले, ब्रह्मकर्मांतर्गत असलेल्या नित्यकर्म सूर्यनमस्कार साधनेचे तप केले. स्वहस्ताक्षरात लिहून काढले. यामध्ये राम-रावण युद्ध आदित्यहृदय स्तोत्र वगैरे भाग आहेत. (वाग्देवता मंदिर, धुळे येथे ही प्रत आहे.) • प्रचारात आहेत त्याहून अगदी निराळी सूर्यनमस्कार नामावली वाग्देवता मंदिर धुळे येथील बाड क्रमांक १२७१ यामध्ये आहे. बाड क्रमांक १६३९ मध्ये इतर अनेक कागदपत्रे आहेत. त्यामध्ये एक 'नमस्कार त्या सूर्यनारायणाशी' हे ध्रुपद असलेली बाराश्लोकी सूर्यस्तुती आहे. समर्थ काळातील हे दस्तऐवज सूर्यनमस्कार साधनेचा चिंतन / अभ्यास दर्शवितात. वाग्देवता मंदिर, धुळे यांच्या सौजन्याने ते आपल्या अवलोकनार्थ परिशिष्टामध्ये दिलेले आहेत. • ग्रंथराज दासबोध या ग्रंथात आलेले सूर्यनारायण व सूर्यनमस्कार यांचे संदर्भ तसेच समर्थांचे जीवन कार्य इत्यादी हे विधान अधोरेखीत करण्यास पुरेसे आहेत. समर्थ रामदास स्वामींचे प्रत्येक कार्य 8 'सावधान' पासून सुरू होते. सावधानतेचा भक्कम आधार घेऊन त्यांनी हरिकथा निरूपण, राजकारण व प्रयत्नवाद समाजापर्यंत पोहचवला. मूठभर परकियांच्या जुलमी सत्तेचे वर्णन त्यांनी श्रीमद् दासबोध या ग्रंथामध्ये केलेले आहे ते प्रत्यक्ष वाचा. त्या काळात त्यांनी सावधानता किती आणि कशी घेतली असेल हे थोडं समजेल. एक उदाहरण वानगी दाखल देतो. प्रसंग तीनशे वर्षांनंतरचा आहे. १९३२ साली श्रीमती. द्वारकाबाई कुर्लेकर यानी बाराशे सूर्यनमस्कार घालण्याचे प्रात्यक्षिक कराड येथील चावडी चौकात सादर केले होते. आझाद हिंद सेनेचे संस्थापक 8 समर्थांच्या कार्यावर आक्षेप घेऊन समाजमन कलुषित करण्याचा प्रयत्न जेव्हा होतो तेव्हा त्यांच्या या 'सावधपणाचा' अत्युच्च गौरव होत असतो असे समर्थभक्त मानतात. एक एक करून सर्व राष्ट्र पुरुषांचे चारित्र्य हनन करा. राष्ट्राचे सर्व आधारस्तंभ काढून टाका. राष्ट्र आपोआप कोसळेल. या चाणक्य नीतीची आठवण अशा वेळी होते.. सूर्यनमस्कार एक साधना २७९