पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुभाषचंद्र बोस या प्रात्यक्षिकाला उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. अभिप्राय दिला की प्रत्येकाने सूर्यनमस्काराचे व्रत घेतले तर हिंदुस्थानचे स्वातंत्र्य दूर नाही. सुभाषबाबुंचे हे मत इंग्रज सरकारला 'समजले'. ही त्यांच्यासाठी धोक्याची सूचना होती. या घंटेचा नाद त्यांनी बंद केला. मसूलकर आश्रमाची सर्व मालमत्ता काहीतरी कारण दाखवून जप्त केली. साधनेची वैशिष्ट्ये- काही धार्मिक विधी नैमित्तिक असतात. उदाहरणार्थ रुद्राभिषेक, सत्यनारायण, महापूजा, यज्ञ-याग इत्यादि यांच्या साग्र आणि सार्थ संहिता उपलब्ध आहेत. नव्हे त्यांचा समावेश वेदांमध्येच केलेला आहे. सूर्यनमस्कार हा नैमित्तिक विधी नाही ती एक नित्यकर्म उपासना आहे. तिची वैशिष्ट्ये लक्षात घेतल्यास सार्थ सूर्यनमस्कार (समग्र) संहिता उपलब्ध कां नाही याचा उलगडा होतो. • साधनेमध्ये सातत्य महत्वाचे. साधनेचे नित्यकर्म (संदर्भ घ्या- पूर्वार्ध, नित्यकर्म) अखंडित पणे सुरू ठेवल्यास ती साधकाची स्वयंसाधना होते. • साधना म्हणजे गुरूमंत्र तो प्रत्येक क्षणी जगायचा व जागवायचा असतो. श्रद्धेने स्वीकारायचा असतो. • साधनेतील सातत्य अबाधित टिकविणे या परीक्षेत दररोज उत्तीर्ण व्हायचे असते. साधनेची परीक्षा घ्यायची नसते. ● • ही स्वयं - साधना म्हणजेच जीवात्म्याची साधना आहे. त्यामध्ये मिळणारी अनुभूती निर्विकार मनाने, त्रयस्थाचे भूमिकेतून फक्त बघायची असते. तिचे विश्लेषण करायचे नसते. त्यामध्ये अडकायचे नसते. तेथे थांबायचे नसते. दुसऱ्यांचे अनुभव ऐकून त्याची अनुभूती मिळविण्यासाठी साधना करायची नसते. असे केल्यास ती साधना राहत नाही तर स्पर्धा होते. ● सूर्यनमस्कार साधनेत आत्मारामाकडून मिळणाऱ्या सूचना मन- - बुद्धीने स्वीकारून त्या शरीराकडून करून घ्यायचा प्रयत्न दररोज करायचा आहे. सूर्यनमस्कार साधना ही ब्रह्मकर्मांर्तगत कर्म असल्याने प्रत्येकाने करणे आवश्यक सूर्यनमस्कार एक साधना ● २८०