पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तप केले. या साधनेचे अलौकिक अनुभवले. आपली वैयक्तिक नित्यकर्म साधना सार्वत्रिक करण्यासाठी भारत भ्रमण केले. समाज परिवर्तनाचा निश्चित उद्देश डोळ्यासमोर ठेऊन बाराशे पेक्षा अधिक मठांची स्थापना केली. भारतीयांमध्ये शक्तीउपासनेतून/सूर्यनमस्कार साधनेतून आत्मतेजाचा वह्नी पुन्हा चेतविला. समाजमनाची पराभूत वृत्ती फुंकून टाकली. स्वाभिमान व स्वदेशप्रेम प्रज्वलित केले. शक्ती उपासनेच्या माध्यमातून अध्यात्म व व्यवहार यांची सांगड घालणारा हा संपूर्ण जगातील एकमेव अध्यामिक संत! समाज मनाला धार्मिकतेचा दैवी आधार देऊन त्यांना बंधमुक्त करणारा 'समर्थ' 'नारायण'’!! रामदास स्वामी प्रभू रामचंद्रांना समर्थ म्हणत असत. स्वतःला ते रामाचा दास म्हणत असत. आपली ओळख रामदास म्हणूनच जन मानसात असावी असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी आपल्या सद् गरु प्रभूरामचंद्रांना आर्तहाक दिली समर्थे समर्थ करावे। तरीच समर्थ म्हणवावे | ब्रीद आठवोनि स्वभावे । करणे ते करावे।। प्रभू रामचंद्रांनी त्यांची ही प्रार्थना मान्य केली. साध्य - साधन-साधक एक झाले. हा त्यांच्या भक्तांचा विश्वास आहे. म्हणून त्यांना सर्व रामदासी भक्तांनी समर्थ ही उपाधी दिली. प्रत्येक रामदासी समर्थ व्हावा ही यामागची तीव्र भावना आहे! रामराज्याचे विश्वव्यापी साम्राज्य व्हावे ही तळमळ आहे!! सूर्यनमस्कार साधनेला जगातील बहुसंख्य देशांनी मान्यता दिलेली आहे. रथसप्तमी हा जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो. त्याच प्रमाणे श्रीमारूती देवस्थान, आगर टाकळी नासिक हे सूर्यनमस्कार शक्तीपीठ म्हणून जगभर गाजले पाहिजे. कारण सूर्यनमस्काराला ऊर्जितावस्था याच ठिकाणी प्राप्त झालेली आहे. • समर्थ रामदास स्वामी लग्नमंडपातून सावधपणे निसटले व गोदातटी नासिकला (१६२०) आले. या प्रवासात एका ठिकाणी झाडाला दोन प्रेते टांगलेली त्यांना दिसली. सरकारी कर न भरल्याबद्दल मुगल सत्तेने त्या दोघांना शिक्षा दिली होती. इतरांमध्ये दहशत निर्माण केली होती. ( रामदास चरित्र, केशव भिकाजी ढवळे प्रकाशन) • आगर टाकळी नासिक येथे १६२१ मध्ये त्यांनी रामायणातील युद्धकांड सूर्यनमस्कार एक साधना २७८