पान:सूर्यनमस्कार एक साधना.pdf/३१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूर्योपासना अधोरेखित करतात. त्याच प्रमाणे सूर्योपासनेचा संदर्भ सर्वच धार्मिक ग्रंथांमध्ये सापडतो. सूर्यनमस्कार किंवा साष्टांगनमस्कार ही सूर्याचीच उपासना आहे. महर्षी वेदव्यास ऋषिंनी अठरा पुराणे लिहिलेली आहेत. त्यातील स्कंधपुराण, शिवपुराण, पद्मपुराण यामध्ये तर साष्टांग नमस्काराची व्याख्या सापडते. उरसा शिरसा दृष्ट्या वचसा मनसा तथा । पदाभ्यां कराभ्यांजानुभ्यां प्रणामोऽष्टांग उच्यते ।। सूर्यनमस्काराचे बीज योगशास्त्रात आहे. पतंजली सूत्र (इ.स.पूर्व २५००० - ३०००) हटप्रदिपिका (१४-१६ शतक), घेरंडसंहिता (१७ शतकाची शेवट ) इत्यादी ग्रंथात योगशास्त्राची माहिती आहे. या शास्त्राचे अंतिम उद्दिष्ट आहे संर्वांगीण आरोग्य ते मिळविण्याचे साधन आहे योगाभ्यास शरीर म्हणजे मातीचे मडके आहे ते योगऊर्जेत चांगले भाजून घ्या. हा या शास्त्राचा संदेश आहे. सूर्यनमस्कार ही योगसाधनेचीच शाखा आहे असे म्हणता येईल. कारण योगासनातील काही आसनांची साखळी म्हणजेच साष्टांगनमस्कार किंवा सूर्यनमस्कारात आहे. माझ्या वाचनात आलेला सूर्यनमस्कार साधनेचा स्पष्ट उल्लेख १३२०- १३५० या दरम्यानचा आहे. हा उल्लेख 'श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत' यामध्ये आलेला आहे. कुर्वपूरयेथे नदी किनारी खडकावर प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ (दत्तात्रेयांचे प्रथम अवतार) एक हजार सूर्यनमस्कार घालत असत. त्यानंतर सूर्यनमस्कार नित्यकर्म करणारे समर्थ रामदास स्वामींचे जनकपिता सूर्याजीपंत नित्य एक हजार सूर्यनमस्कार घालीत होते. हा उल्लेख १५-१६ शतकातील सापडतो. त्यानंतरचे काही महत्त्वाचे उल्लेख उत्तरार्ध विभाग तीन मधील शंका समाधान आणि मानाचा मुजरा यामध्ये दिलेले आहेत. त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करीत नाही. एकूणच सूर्यनमस्कार साधनेचे अस्तित्व वैदिक कालापासून जाणवते. पण त्याचे प्रत्यक्ष व स्वतंत्र उल्लेख फारच थोडे सापडतात. काळाच्या ओघात ही साधना मागे पडली. हळू हळू ती विस्मृतीमध्ये गेली. समर्थ रामदास स्वामी यांचे वास्तव्य १६२० ते १६३२ आगर टाकळी नासिक येथे होते. ही त्यांची तपोभूमी. आपले सद्गुरू आदित्यवंशावतंस प्रभुरामचंद्रांची नित्य पाद्यपूजा या ठिकाणी त्यांनी केली. ही पाद्यपूजा त्यांनी सूर्यनमस्कार, गायत्री पुरश्चरण या सूर्योपासनेतून केली. या ठिकाणी त्यांनी बारा वर्षे ब्रह्मकर्मांतर्गत असलेल्या सूर्यनमस्कार साधनेचे सूर्यनमस्कार एक साधना २७७